आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Nitin Gadakari Rally In Akola, Divya Marathi

कार्यकर्त्यांनी विरोधकांनाही जोडणे गरजेचे : नितीन गडकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ‘कार्यकर्त्यांनी विरोधकांची यादी तयार करत आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घेत भाजपच्या पदरी अधिक मते मिळवावी,’ असे अवाहन भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी येथे केले. अकोला लोकसभा मतदारसंघातील बुथ कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. शुक्रवारी 21 फेब्रुवारीला दुपारी मराठा मंगल कार्यालयातील या मेळाव्यात ते म्हणाले, की विरोधकांशी मैत्री करा. ज्यांनी भाजपला मत दिले नाही त्यांना भेटा, असे आवाहन त्यांनी केले. जातीयवादी राजकारण करून विकास करणे शक्य होत नाही.

जातीयवादाचे राजकारण करणार्‍यांना तडीपार करा. भारिप बमसंने जातीयवादाचे राजकारण केले आहे. त्यामुळे शहराचा विकास होणार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, डॉ. रणजित पाटील, हरीश पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी रवी भुसारी, लखन मलिक, विजय जाधव, रमण जैन, सुरेश लुंगे, अभय पाटील, रामदास आंबटकर, सुनील राजे, भारती गावंडे, स्मिता राजनकर, सुमन गावंडे, युवराज गावंडे, हरीश आलिमचंदानी आदी या वेळी उपस्थित होते.

हाऊस टू हाऊस जा : नितीन गडकरी
या लोकसभा मतदारसंघात सभा, कार्यकर्ता संमेलनात फरक आहे. पक्षासहआणि विरोधकांची भूमिका आपण जाहीर सभेत करतो. कार्यकर्त्यांच्या सभेत आपण कशी लढाई लढणार आहोत व ती कशी जिंकू, याविषयीची माहिती बुथ प्रमुखांना देण्याची गरज आहे. या निवडणुकीत विजयासाठी हाऊस टू हाऊस, मॅन टू मॅन, हार्ट टू हार्ट जाण्याची गरज आहे.पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी.

भारिप-बमसं बसला बोकांडी : फुंडकर
संजय धोत्रेंना मी खासदार म्हणणार नाही ते तर उमेदवार आहे. लढाईला सुरुवात झाली आहे. बुथ प्रमुखांना काही सांगण्याची गरज नाही. 1989 पासून अकोल्याचा गड काबीज केला आहे. भाजप-शिवसेनेचा झेंडा कायम ठेवला त्या विजयाच्या हॅटट्रिकची पुनरावृत्ती करा. आमची लढाई कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी नव्हे तर या जिल्हय़ाच्या बोकांडी बसलेल्या भारिप-बमसं सोबत आहे.

अराजकतेतून सुटका हवी : देवेंद्र फडणवीस जीवनात 5 टक्के लोक इतिहास घडवतात, 95 टक्के तो वाचतात. माझ्या समोर बसलेले सर्वजण इतिहासाचा नवा अध्याय लिहिणारे आहेत. काँग्रेस सरकारमुळे अराजकता निर्माण झाली आहे. लोकांची या अराजकतेतून सुटका करण्यासाठी नरेंद्र मोदीच्या स्वरूपात आशेचे किरण दिसत आहे. ‘आप’ने दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाही. बाहेर राहून दुसर्‍याला बोट दाखवता येते. पण, स्वत:कडे चार बोटे असतात, हे ‘आप’ विसरले.

नरेंद्र मोदींची लाट : खासदार धोत्रे
आपली स्पर्धा आपल्यासोबत असून, प्रत्येक मतदाराशी संपर्क करा. राज्य व केंद्रातील सत्ता भ्रष्टाचारी आहे. दोनवेळ विजयी झालो तेव्हा 50 टक्के मते मिळाली, नेमके आपले सरकार आले तेव्हा भाऊसाहेब लोकसभेत गेले नाही. ती खंत आहे. या सरकारने लोकांना पंगू केले. लोकांचा काँग्रेस व राष्ट्रवादीवर विश्वास नाही. नरेंद्र मोदी पाहिजे आता, अटलजी, इंदिरा गांधी यांच्या सभा होत्या, त्या वेळी टीव्ही सर्वत्र नव्हता. नरेंद्र मोदींच्या सभा या लाखोंच्या सभा होतात. नरेंद्र मोदीची लाट आली आहे. बुथ प्रमुख आपला आत्मा, कार्यकर्ता श्वास आहे.

भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांच्या संकल्प मेळाव्यात ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

ही काय सभा आहे ?: ही काय सभा आहे, असा प्रश्न दादाने विचारला. भाजप बुथ कार्यकर्ता मार्गदर्शनाला सभा ठरवत किती गर्दी या सभेला, असा प्रश्न यांना पडला होता. या कार्यक्रमात ‘एक नोट कमल को व्होट’ याचा समारोप झाला. या सभेत नितीन गडकरी यांनी बुथ प्रमुखांना मार्गदर्शन केले. पण, त्या वेळी उशीर झाला होता. इतरांनी तर पक्षाच्या सभेसारखे भाषण दिले.

यांचा भाजपमध्ये प्रवेश : छावा संघटनेतून गजानन पाटील, काँग्रेसमधून गोविंद पांडे, प्रकाश खेडकर, भाजपमधून बाहेर गेलेले विनोद मनवाणी, नगरसेवक संजय बडोणे, माधुरी बडोणे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते तसेच रामदास तायडे, श्याम थोरे, संजय पिसे, चेतन भोयर यांनी ढोल-ताशाच्या गजरात भाजपमध्ये प्रवेश केला.