आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राहुल’ गांधींच्या दौर्‍यामुळे अकोल्‍यात काँग्रेसमध्ये राजकारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागपूर दौर्‍यावरून अकोल्यात जोरदार राजकारण रंगत आहे. या राजकारणाचा फटका जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना बसला आहे. जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष व महासचिवांना या दौर्‍याची साधी माहितीही देण्यात आली नाही तसेच त्यांची राहुल गांधी यांच्यासोबत होणारी भेटदेखील टाळली. दरम्यान, याबाबत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाबाराव विखे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी व्यस्त असल्याचे सांगत या विषयावर भाष्य देणे टाळले.

राहुल गांधी यांच्यासोबत जिल्हा काँग्रेस पदाधिकार्‍यांची 24 सप्टेंबरला नागपूर येथे भेट होणार आहे. जिल्ह्य़ातील सर्वच मुख्य पदाधिकार्‍यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांना या भेटीत कोण असेल याची यादी पाठवली आहे. या यादीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवार, ग्रामीण व शहरचे जिल्हाध्यक्ष, ग्रामीण व शहरचे प्रत्येकी चार उपाध्यक्ष, चार महासचिव, कोषाध्यक्ष याशिवाय महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेत विजयी सदस्य व इतरांची थेट राहुल गांधी भेट मंगळवारी निश्चित करण्यात आली आहे.

नागपूर येथील या भेटीच्या कार्यक्रमाची साधी माहितीदेखील जिल्हा काँग्रेसने दिली नाही. त्यामुळे नागपूर येथे जाण्याचा प्रश्नच नाही, अशी माहिती पक्षाच्या उपाध्यक्ष व महासचिवांनी दिली. यामध्ये ज्येष्ठ नेते अनंतराव बगाडे, विजय कौसल, राजेश भारती व प्रकाश तायडे यांनी दिली आहे. या नेत्यांनी पक्षाने आमची नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठवली नसल्याने राहुल गांधी यांच्याशी होणारा संवाद थांबला आहे. त्यामुळे नागपूर येथे आज गेलो नसल्याचे सांगितले.

गणगणेंकडे झाली बैठक
जिल्हा काँग्रेसच्या एकाधिकाराची तक्रार काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्‍यांनी थेट प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री सुधाकर गणगणे त्यांच्याकडे केली. अखिल भारतीय व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिलेल्या आदेशानंतर राहुल गांधी याची भेट का थांबवण्यात आली, असा प्रश्न पदाधिकार्‍यांनी केला आहे.

शहर काँग्रेसचे पदाधिकारी नागपुरात
शहर काँग्रेसमध्ये अनेक वाद असले तरी, शहरातील अनेक पदाधिकारी नागपूरला गेले आहे. महापालिकेचे काँग्रेसचे सर्व नगरसेवक, उपमहापौर रफिक सिद्दीकी, काँग्रेस नेते विजय देशमुख, गटनेते दिलीप देशमुख यांनी आज सकाळीच नागपूरकडे प्रयाण केले