आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदान केंद्रावर शिक्षकांची पोलिसांसमोर दादागिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवारी, 20 जून रोजी मतदान झाले. मतदानाच्या ठिकाणी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनसमोर तंबू ठोकल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. शहरातील सिव्हिल लाइन भागातील विद्यामंदिर गल्र्स हायस्कूलसमोर विदर्भ जनसंग्राम शिक्षक संघटनेचे उमेदवार शेखर भोयर, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेळके, शिक्षक आघाडीचे र्शीकांत देशपांडे, आमदार वसंतराव खोटरे, काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रा. प्रकाश तायडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे रामदास बारोटे, भारिप बहुजन महासंघाचे संतोष हुशे, मराशिपचे र्शीकृष्ण अवचार, इनसाचे सुभाष गवई, लोकभारती पक्षाच्या वर्षा निकम, विजय गुल्हाणे, रवींद्र मेंढे, नरहरी अर्डक, जयदीप देशमुख, सज्रेराव देशमुख, अजमज युसूफ खान, गुलाम अहमद अमानउल्ला खान या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी तंबू ठोकले होते. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी निवडणूक विभागाकडून घेण्यात आली नव्हती.
अतिक्रमण हटाव विभागाचाही कानाडोळा
शहरात शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने मोहीम राबवत अनेकांवर कारवाई केली. सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनसमोरील तंबूचे अतिक्रमण मात्र अतिक्रमण हटाव विभागाला दिसले नाही की, याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले, असा प्रo्न उपस्थित झाला आहे.