आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात प्रदूषणाला ‘फटाके’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- रविवारी झालेल्या लक्ष्मीपूजनाला शहरात पाच ते सहा कोटी रुपयांचे फटाके फोडण्यात आले असून, फटाक्यांचा धूर आणि आवाजामुळे प्रदूषणाचा कहर निर्माण झाला.

दिवाळीला आनंदोत्सव साजरा करताना दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे फटाके फोडण्यात येतात. यामुळे पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. गतवर्षी जिल्ह्यात चार ते पाच कोटी रुपयांचे फटाके फोडले होते. या वर्षी वाढलेली महागाई व नागरिकांमधील उत्साहामुळे लक्ष्मीपूजनाला पाच ते सहा कोटी रुपयांचे फटाके फोडण्यात आले. फटाक्यांमधून विविध रंग निघण्याकरिता अँल्युमिनिअम, अँटमनी सल्फाईड, बेरियम नायट्रेट तसेच तांबे, शिसे, लिथियम, स्टनॅन्शयम, अर्सेनिक यासारख्या घटकांचा वापर केला जातो. फटाके फोडल्यानंतर निघणार्‍या धुरामुळे अनेक दुर्धर व्याधी होतात. रुग्ण, गर्भवती महिलांसह नवजात मुलांसाठी तो घातक आहे. तसेच आग लागणो, मुले भाजण्याचे प्रकार घडतात. फटाक्यांमध्ये खर्च होणार्‍या पैशांमधून मुलांना खाऊ घ्या किंवा पुस्तके खरेदी करण्याकरिता खर्च करा, असा सल्लाही सामाजिक संघटनांकडून देण्यात आला होता. मात्र, याकडे अनेक लोकांनी दुर्लक्ष करून लक्ष्मीपूजनाला फटाके फोडण्याचा आनंद लुटला.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अभ्यंगस्नानापासून सुरू झालेली आतषबाजी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. काहींनी नियम डावलून रात्री 10 वाजतानंतरही उशिरापर्यंत फटाके फोडण्याचा आनंद घेतला. आणखी दोन दिवसांत सुमारे पाच कोटी रुपयांचे फटाके फोडले जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. फटाके हे ठरवून दिलेल्या र्मयादेपेक्षा अधिक डेसिबलचे आहेत आणि आरोग्यावर परिणाम करणारे आहेत. आनंद देणार्‍या फटाक्यांमधली स्फोटकेत्यांचा धोका वेळीच ओळखला तर दिवाळीचा निर्धास्तपणे आनंद लुटता येईल.


फटाके फोडण्याची स्पर्धा :
कर्णकर्कश आवाज करणार्‍या या फटाक्यांमुळे रुग्ण, आबालवृद्धांसह पशुपक्षी आणि पर्यावरणालाही हानी पोहोचते. मात्र, फटाके फोडण्याच्या स्पर्धेत याचा विचार होत नाही़ फटाके फोडण्याची स्पर्धा लागत असल्याने उत्सवाचे स्वरूप विकृत होत आहे.

मर्यादा ओलांडताहेत फटाके : दिवाळीतील फटाक्यांचा आवाज रक्तदाब वाढवू शकतो़. कायमचा बहिरेपणही येऊ शकते. काही फटाके 120 डेसिबल आवाजाची र्मयादा ओलांडतात. मानवी कानांची ग्रहणक्षमता 125 डेसिबल आह़े. नियमांनुसार फटाक्यांना आवाजाची मर्यादा 90 डेसिबल एवढी घातलेली आह़े शांतता क्षेत्रातील आवाजाची मर्यादा 50 डेसिबल आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते.