आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अघोषित भारनियमन, रात्री उशिरापर्यंत पूर्ण शहर अंधारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पॉवरग्रीडच्यावीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीज असतानाही शहरात दुपारी वाजेपासून भारनियमन करावे लागले. ही परिस्थिती राज्यात निर्माण झाली असून, सकाळी वाजतापासून वेगवेगळ्या शहरात अघोषित भारनियमन करण्यात आले.
रात्री उशिरापर्यंत वीज प्रवाह बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. औरंगाबाद ते पॉवरग्रीड ४०० केव्हीए, वर्धा ते औरंगाबाद ७६५ केव्हीए आणि औरंगाबाद ते तळेगाव ४०० केव्हीए या वाहिन्यांवरील तांत्रिक बिघाड अतिभारामुळे ही स्थिती निर्माण झाली. यामुळे वीज उपलब्ध असतानाही सुमारे ६०० ते ७०० मेगावॉट वीज ग्राहकांपर्यंत वीज पोहोचवण्यात अडचणी आल्या. पॉवरग्रीडच्या वीज वाहिन्यांमध्ये आलेल्या बिघाडाचा फटका नागरिकांना बसला.
नवरात्रोत्सवाच्या काळात अचानक खंडित झालेल्या वीज प्रवाहामुळे उत्साहावर एक प्रकारचे विरजण पडले. रात्री उशिरापर्यंत पूर्ण शहर अंधारात होते. त्याचा फटका गरबा, दांडियाच्या कार्यक्रमाला बसला. शहरातील अनेक भागांत दुपारपासून, तर काही भागांत सायंकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला. पूर्ण शहरातील वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली होती.