आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरामध्ये विजेचा लपंडाव सुरू; नागरिकांना मनस्ताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महावितरणतर्फे एकाच फीडरवर अनेक वेळा देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शहरातील रामदासपेठ, भागवत प्लॉट, महसूल कॉलनीसह अनेक भागात शनिवारी वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे वीज ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. गेल्या अनेक दिवसांपासून भारनियनाव्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय अतिरिक्त दाबामुळे विद्युत साहित्याचे नुकसान होत आहे.

महावितरणच्या 39 फीडर्सवर वीजपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी 31 फीडर्स भारनियमन मुक्त असून, आठ फीडर्सवर विविध र्शेणीत भारनियमन केले जाते. दरम्यान महावितरणच्या म्हणण्यानुसार देखभाल, दुरुस्तीचे कार्य सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या फीडर्समध्ये सहा तासांसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येतो.

बार्शिटाकळीत आज ‘शट डाउन’ : औद्योगिक वसाहतीतील 132 केव्हीच्या उपकेंद्रात रविवारी देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे बार्शिटाकळीच्या 33 केव्ही व 11 केव्हीवरचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, बार्शिटाकळीसह पिंजर, महान, धाबा येथील वीजपुरवठा सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.