आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prakash Ambedkar News In Marathi, Akola, Divya Marathi

निवडणुकीचा आखाडी: प्रकाश आंबेडकर यांचा ‘कॉर्नर’ बैठकांवर भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे अकोला मतदारसंघाचे उमेदवार अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्यांनी गुरुवारी अकोला आणि बाळापूर येथे ‘कॉर्नर’ बैठका घेतल्या. अँड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी दिवसभरात बाळापूर येथे वेगवेगळय़ा प्रभागात चार कॉर्नर बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यांनी इतर लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांच्या बैठकीही त्यांच्या निवासस्थानी तसेच पक्ष कार्यालयात घेतल्या. या वेळी त्यांच्यासोबत पक्षाचे आमदार तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.