आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणावर तोडगा सांगू ,पण आधी सत्ता द्या : आंबेडकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मराठा, मुस्लिम आरक्षण लागू होत असताना याचा फटका गुणवंत विद्यार्थ्यांना बसता कामा नये. आरक्षणाबद्दल सर्वसमावेशक निश्चित असे धोरण केले पाहिजे. आतापर्यंत आम्हाला सरकारी जावई, असे म्हटले जात होते. आता मराठा आरक्षणाच्या माध्यमातून तेही सरकारी जावई झाले आहेत. त्यामुळे इतरांचे काय, असा प्रश्न कायम आहे. आरक्षणाचा हा मुद्दा रोज चर्चिला जाईल, याविषयी आमच्याजवळ सर्वसमावेशक तोडगा आहे. पण, तो तोडगा सांगितला तर इतर पक्ष हायजॉक करतात. त्यामुळे जनतेने आम्हाला सत्तेवर बसवावे, मगच आरक्षणाचा तोडगा सुचवू, असे मत भारिप-बमसंचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
विधानसभा लोकशाही विकास आघाडीच्या माध्यमातून
आम्ही राज्यात विधानसभा निवडणूक ही लोकशाही विकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत. राज्यातील सर्वच जागांवर आमचे सशक्त उमेदवार राहतील. आता आम्ही राजकीय अस्पृश्य आहोत, त्यामुळे कुणासोबत आघाडी किंवा युती करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही स्वबळावर राज्यात निवडणूक लढवू, येत्या काळात विधानसभा निवडणुकीचे चित्र आम्ही स्पष्ट करू, असेही त्यांनी म्हटले.
जिल्हा पातळीवर निवड होईल
अकोला जिल्ह्यात दोन विद्यमान आमदारांचे तिकीट निश्चित आहे. अकोला पूर्व व बाळापूर येथे आमचे जुनेच आमदार लढतीत कायम राहतील. पण, इतर तीन ठिकाणी आम्ही उमेदवारांचा शोध घेत आहोत. ती जबाबदारी जिल्हा निवड समितीला दिली आहे. विधानसभा निवडणुकीचे सर्वच मुद्दे जाहीर केल्यास इतर पक्षांना व्यूहरचना निश्चित होते ते मुद्दे गुपित आहेत. उमेदवारांची चाचपणी सुरू असून, सर्वच कसे सांगता येईल.
रिपब्लिकन सेना नाहीच ना : रिपब्लिकन सेना उभी करण्याचा प्रयत्न अकोल्यात केला गेला. पण, ती जशी उभी राहिली तशीच ती येथे मोडीत निघाली. त्यामुळे त्याची चिंता नाही. भारिप-बमसंसोबत संपूर्ण विदर्भात, मराठवाड्यात प्रत्येक समाज जुळला आहे. दलित, मागासवर्गीय यांच्या हक्काची ही लढाई आहे. त्यामुळे रिपब्लिकन सेनेचा मुद्दा निकाली निघाला आहे.
पालकत्व शुद्ध हवे
जिल्हाधिकारी अरुण शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांच्यावर चंद्रपुरात फौजदारी गुन्हा दाखल झाला. ते जिल्ह्याचे पालक आहेत. जिल्हाधिकारी या पदाचा त्यांनी स्वत:हून त्याग केला पाहिजे.