आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pressure On The BJP Councilors Issue At Akola, Divya Marathi

भाजप नगरसेवकावर दबाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रामनगरातील तोष्णीवाल ले-आऊट भागातील खेळाचे मैदान व सांस्कृतिक भवनाच्या जागेचा मुद्दा उपस्थित करणार्‍या नगरसेवकावर भाजपमध्ये नुकत्याच आलेल्या नगरसेवकाने दबाव वाढवल्याची माहिती आहे. महापालिकेने या भागातील विकासकामे थांबवण्याची नोटीस दिली असताना ती केराच्या टोपलीत गेल्याचे चित्र दिसत आहे.

रामनगर येथील खुल्या भूखंडावर खडीकरणाच्या माध्यमातून रस्ता करण्यात येत आहे. येथील खेळाचे मैदान व सांस्कृतिक भवनाच्या जागेवर रस्त्याचे खडीकरण, विकासकामे होत आहेत. ती कायदेशीर नाहीत, त्यामुळे तत्काळ थांबवण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेवक आशीष पवित्रकार यांनी केली होती. या मागणीनंतर केवळ या रस्त्यावरील विकासकामे थांबवण्याचा आदेश महापालिकेच्या नगर रचना विभागाने दिला. पण, प्रत्यक्षात या ठिकाणी विकासकामे होताना आजही दिसत होते. केवळ रविवार असल्याने अधिकार्‍यांनी याची दखल घेतली नाही. तर, तक्रारकर्त्यांनी महापालिका अधिकार्‍यांना सांगूनदेखील विकासकामे थांबलेली नाहीत.

ते नगरसेवक कोण?
स्वपक्षीय भाजप नगरसेवकावर दबाव आणणारे ते नगरसेवक कोण व या भागातील इतर नगरसेवक, लोकप्रतिनिधी या विषयावर गप्प का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केवळ येथील विकासकामे थांबवण्याचा आदेश महापालिका नगर रचना विभागाने उर्वरित. पान 4
दिला आहे. असे असताना गुंठेवारी नियमात विकास करण्याचा महापालिकेचा आदेश रद्द का करत नाही, अशी विचारणा आता होत आहे. या गुंठेवारीस खासदार संजय धोत्रे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोध केला होता, हे विशेष. त्यामुळे भाजप नगरसेवकावर स्वपक्षीयांचा दबाव असण्याचे कारण काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.