आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात डेंग्यूसह साथीच्या आजाराचे थैमान; उपचार मिळत नसल्याने रुग्ण झाले त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जिल्ह्यातसध्या डेंग्यूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. थातूरमातूर उपचाराशिवाय काहीही करू शकणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून अशा रुग्णांना अकोल्याला रेफर करण्यात येत आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या खाटांशिवाय सतरंजीवर उपचार घेत आहे. हिवाळा लागला तरी साथीचे आजार थांबण्याचे नाव नाही. ग्रामपंचायतीकडूनदखल नाही : ग्रामपंचायतीकडूनवेळीच स्वच्छतेबाबत दखल घेतली असती तर साथीचे आजार वाढले नसते. आज जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अस्वच्छता आहे. सांडपाण्याची याेग्य विल्हेवाट हाेत नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
डॉक्टरगैरहजर : प्राथमिकआरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय स्तरावर वेळेवर डॉक्टर हजर राहत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सरकारी डॉक्टर शासकीय रुग्णालयातील रुग्ण सोडून गावात आपली खासगी प्रॅक्टिस करण्यात व्यस्त आहेत.