आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च प्राथमिक शाळेत सुरू होणार तासिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनपाच्या प्राथमिक शाळेत कार्यरत उच्चशिक्षित शिक्षकांची उच्च प्राथमिक शाळेत बदली करून या शाळांमध्ये तासिका सुरू करा, असा प्रस्ताव भारिप-बमसंचे गटनेते गजानन गवई यांनी २१ ऑगस्टच्या महासभेत मांडला. हा प्रस्ताव महापौर ज्योत्स्ना गवई यांनी मंजूर केला. दैनिक ‘दिव्य मराठी’ने मनपाच्या शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे वदि्यार्थ्यांच्या होणार्‍या शैक्षणिक नुकसानीबाबत वृत्त प्रकाशित केले होते. गजानन गवई यांनी हा प्रस्ताव मांडताना ‘दिव्य मराठी’तील शिक्षणाबाबतच्या विविध वृत्तांचा उल्लेखही केला.
सभेत शिक्षण विभागाबाबत बोलताना गजानन गवई म्हणाले, मनपात बीएससी बीएड शिक्षक उपलब्ध आहेत. मात्र, हे शिक्षक प्राथमिक शाळेत नियुक्त आहेत. तर ज्या शाळांमध्ये पहिली ते सातवी-आठवी वर्गापर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी डीएड शिक्षक कार्यरत आहेत. या सर्व प्रकारामुळे वदि्यार्थ्यांची संख्या घटली आहे. आठव्या वर्गापर्यंत शिक्षणाची व्यवस्था असताना इतर शाळांप्रमाणे तासिकाही होत नाहीत. यामुळे मनपा शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरला आहे. दिव्य मराठीत या विषयाच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून वृत्त प्रकाशित होत आहे. त्यामुळे जे उच्चशिक्षित शिक्षक शाळांव्यतिरिक्त मनपाच्या इतर विभागात कार्यरत असतील ते शिक्षक तसेच प्राथमिक शाळेत कार्यरत उच्चशिक्षित शिक्षकांच्या त्वरित बदल्या कराव्या, असा प्रस्ताव मांडला.

शाळा क्रमांक २६ चे कौतुक
मनपाच्या इतर शाळांमधील वदि्यार्थी संख्या घटली असताना शाळा क्रमांक २६ मध्ये वदि्यार्थ्यांची संख्या वाढती आहे. महापालिकेच्याच या शाळेने इतर खासगी शाळांसमोर आव्हान उभे केले आहे. याबाबत नगरसेवक दिलीप देशमुख यांचे कौतुक करून गजानन गवई यांनी शाळा क्रमांक २६ प्रमाणेच महापालिकेच्या इतर शाळांनी प्रगती करावी, यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
तिवारींची बदली रद्द
मनपातील शिक्षिका सारिका तविारी यांची काही दिवसांपूर्वीच मनपाच्या कोर्ट विभागात विधी सल्लागार म्हणून बदली केली. याबाबत कोणताही प्रस्ताव महासभेत मंजूर झाला नाही. असे नसताना ही बदली कशी झाली? असा प्रश्न गजानन गवई यांनी सभागृहात उपस्थित करून वदि्यार्थ्यांचे नुकसान होत असताना झालेल्या या सर्व बदल्या रद्द करा, अशी गजानन गवई यांनी केलेली मागणी महापौरांनी मान्य केली.