आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Private Company Fertilizer Study In Agriculture University Akola

खासगी कंपन्यांच्या वाणांचा होणार राज्यातील कृषी विद्यापीठांत अभ्यास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - खासगी कंपन्यांमार्फत विकसित करण्यात येणार्‍या विविध वाणांचा आता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून किमान दोन वर्षे अभ्यास केला जाणार आहे. त्यातून त्या वाणाची योग्य गुणवत्ता शेतक र्‍यांना समजणार आहे.

सध्या राज्यात खरीप हंगामात जवळपास 20 लाख क्विंटल बियाण्यांची विक्री होते. त्यापैकी 50 ते 55 टक्के खासगी कंपन्यांच्या वाणांची विक्री होते. बियाण्यांची विक्री करताना खासगी कंपन्यांवर कोणत्याही प्रकारचे कडक निर्बंध नसल्यामुळे अनेक कंपन्यांकडून शेतक र्‍यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र, या कंपन्यांच्या वाणांचा अभ्यास करण्यात येणार असल्यामुळे त्या वाणाची योग्य गुणवत्ता शेतक र्‍यांना कळणार आहे तसेच या अभ्यासातून ते वाण किती प्रभावी आहे, याचीही माहिती प्राप्त होणार आहे.

खासगी कंपनीच्या वाणांच्या सर्व बाजू विद्यापीठात अभ्यास करून तपासल्या जातील. त्यामुळे या वाणांची योग्य गुणवत्ता समजणार आहे. जयंत देशमुख, संचालक, निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण, पुणे