आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील संस्थाचालकांनी झेडपीस लावला लाखोंचा चुना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- प्रामाणिकपणाचे धडे देणा-या जिल्ह्यातील खासगी १४ शिक्षण संस्थांनी जिल्हा परिषदेचे लाखो रुपये भाडे थकित ठेवून बांधकाम विभागाला लाखो रुपयांचा चुना लावल्याचे उघड झाले. याप्रकरणी संबंधित इमारती ताब्यात घेण्याची कार्यवाही जिल्हा परिषद प्रशासनामार्फत केली जात आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम िवभागाने इमारती बांधून त्या भाडेतत्त्वावर १४ शिक्षण संस्थांना भाड्याने दिल्या आहेत. सुरुवातीला या इमारतींचे वार्षिक भाडे २५०० ते ५५०० रुपये होते. या भाड्यात बांधकाम विभागाने करारनामा करून भाडेवाढही केली. काही संस्थाचालकांनी गरज म्हणून करारनामा केला. मात्र, भाडे भरण्यासाठी मात्र पुढाकार घेतला नाही. अनेक शिक्षण संस्थाचालकांना मुख्याध्यापकांना थकित भाडे भरण्याचा विसर पडल्याचे दिसून येते. या खासगी संस्थांवर देखरेखीची जबाबदारी असणाऱ्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी यांनी संस्थाचालकांना वारंवार सूचना करूनही थकित भाडे भरण्यासाठी संस्थाचालकांकडून नकार मिळत असल्याचे वास्तव आहे.
सन २०११ मध्ये याबाबत जिल्हा परिषद इमारती खासगी शाळांना भाड्याने दिल्याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, तेव्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ग्रामविकास जलसंधारण विभागाच्या उपसचिवांना याबाबतची माहिती दिली होती हे विशेष. त्या वेळी भाडे भरण्यात दिरंगाई करणाऱ्या संस्थांकडून इमारती ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश उपसचिवांनी दिले होते. मात्र, त्याकडेही जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले.
अधिका-यांकडून चालढकल
खासगीशाळांकडे लाखो रुपये थकित असतानाही तत्कालीन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बांधकाम िवभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कुठलीही कारवाई यांच्याविरुद्ध केली नसल्याचे दिसून येते. वेळीच थकित भाडे भरले नाही म्हणून जागा ताब्यात घेतली असती, तर जिल्हा परिषदेचा कर बुडाला नसता.
सुधारित भाडे देण्यासही नकार
जिल्हापरिषदेने नवीन भाडे आकारून तशी अट करून घेतली. मात्र, तरीसुद्धा यापैकी काही संस्था जुन्याच भाड्याप्रमाणे पैसे जमा करत असल्याचे दिसून येते.
भाडे वसुलीसाठी प्रयत्न सुरू
जिल्हापरिषदेने कर वसुली थकित भाडे वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या संस्थांकडेही असलेले थकित भाडे निश्चित वसूल केले जाईल. संस्थांनी स्वत: पुढाकार घेऊन आपल्याकडील थकित रकमेचा भरणा करावा, जेणेकरून होणारी कारवाई टळू शकेल. शरदगवई, अध्यक्ष, जिल्हा परिषद.
शाळेचे नाव वसूल केलेले भाडे थकित भाडे-
शिवाजीविद्यालय, शहर शाखा अकोला २,६६,१६० निरंक
महात्मा गांधी विद्यालय, गांधीग्राम १,६२,१८० निरंक
महात्मा फुले विद्यालय, आगर २७,३०० निरंक
बाबासाहेब आपोतीकर विद्यालय, आपोती निरंक निरंक
शंकर विद्यालय उरळ बु. २९,६४० २४८९०
नानासाहेब चिंचाेळकर विद्यालय, वाडेगाव ७२२४ निरंक
शिवाजी िवद्यालय, राजंदा ३८,६२४ निरंक
नीळकंठ सपकाळ विद्यालय, पाथर्डी ४,८२५ १६,२१२
बाबासाहेब खोटरे विद्यालय, सिरसोली िनरंक निरंक
नरसिंग महाराज बहुउद्देशीय विकास संस्था,अकोट १०,००० ५,०००
शिवाजी िवद्यालय, कुटासा माहिती उपलब्ध नाही १८३७२०
बपोरीकर विद्यालय, मूर्तिजापूर माहिती उपलब्ध नाही ८८,८००
विद्याभारती वसतिगृह, शेलू बाजार १६,००० १२,०००
यशवंतराव चव्हाण विद्यालय, अकोट ३,६९,००० ३,१६,८००