आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्या पैशांची वानवा, ग्राहक झाले त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- दिवाळीसारख्या सणादरम्यान झालेल्या मोठय़ा खरेदीदरम्यान आणि खरेदीनंतर कराव्या लागलेल्या व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या चिल्लर पैशांचा तुटवडा आता प्रकर्षाने जाणवू लागला आहे. त्यासाठी बँकांकडून आवश्यक प्रमाणात चिल्लर देण्यात येत नसल्याची ओरड व्यापार्‍यांकडून करण्यात येत आहे. याचा परिणाम म्हण्जे ग्राहक आणि व्यावसायिक तसेच प्रवासी व वाहक यांच्यात नेहमी वाद होत आहेत. गेल्यावर्षी दिवाळीनंतर बँकांकडे रिझर्व्ह बँकेकडून पुरेशा प्रमाणात चिल्लरचा पुरवठा झाला नाही. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दैनंदिन जीवनात सामान्य नागरिकांना दूध, भाजीपाला, किराणा यापासून ते थेट रिक्षावाल्यापर्यंत प्रत्येकाला कमी-अधिक प्रमाणात चिल्लर देण्या-घेण्याची वेळ येते. अशा वेळी चिल्लर नसल्याने एकतर उर्वरित रुपया-दोन रुपयांवर पाणी सोडावे लागते किंवा तेवढय़ासाठी वादविवादाचे प्रसंग उद्भवण्याचे प्रकार सातत्याने घडतात. दरवर्षी रिझर्व्ह बँकेकडून कोट्यवधी रुपयांची नाणी बाजारात आणली जात असताना आणि दर तीन महिन्यांनी ती नाणी बँकांकडे पाठविली जाऊनदेखील नाण्यांच्या टंचाईची परिस्थिती का उद्भवते, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

ही आहेत प्रमुख कारणे
काही नागरिक व भिकारीदेखील हेतुपुरस्पर नाणी गोळा करून 100 रुपयांच्या बदल्यात 90 रुपयांची नाणी देण्याचा व्यवसाय करतात. या विविध कारणांमुळेच नाणेटंचाईची समस्या बिकट बनत चालली आहे. देवस्थानांकडे जी नाणी जमा होतात, ती नाणी बँक वजनावर घेऊन डम्प करतात.

बळजबरीने चॉकलेट मारले जाते माथी
किराणा दुकानापासून हॉटेल व्यावसायिकांपर्यंत नाण्यांना पर्यायी चलन म्हणून काही विशिष्ट कंपन्यांचे एक रुपयाला मिळणारे चॉकलेट ग्राहकांच्या माथी मारण्याची प्रथा रूढ झाली आहे. रुपया-दोन रुपयांसाठी कुठे डोके लावायचे म्हणून ग्राहकही चॉकलेट स्वीकारून मार्गस्थ होतो. अशाच क्लृप्त्या वापरून कंपन्या मोठय़ा होत आहेत.