आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांनी समाजातील समस्या सोडवाव्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- युवकांनी क्षमतांचा वापर समाजातील समस्या सोडवण्यासाठी करावा, असे आवाहन प्रा. प्रदीप अवचार यांनी केले. खडकीच्या धाबेकर कला महाविद्यालयामध्ये युवा सप्ताहानिमित्त झालेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्राचार्य डॉ. संगीता नाईक अध्यक्षस्थानी होत्या. संयोजक प्रा. अमरीश गावंडे, विद्यार्थी प्रतिनिधी पूजा माटोडे व्यासपीठावर होत्या.राष्ट्रउन्नतीसाठी युवा, या विषयावर प्रा. अवचार यांनी मत व्यक्त केले. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यास मार्ग निघू शकतो, असेही ते म्हणाले. प्रा. अनिल ठाकरे म्हणाले, राष्ट्राच्या जडणघडणीत योग्य विचारांचा आधार युवकांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरेल. स्वत:मध्ये सामर्थ्य निर्माण करा, असेही त्यांनी सांगितले. आरंभी, स्वामी विवेकानंद, गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. डॉ. संगीता नाईक यांनी, विवेकानंदांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले. सुत्रसंचालन मंगेश अव्हाळे तर आभार प्रा. राहुल घुगे यांनी केले.