आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावणे तीन हजार मालमत्तांचे मोजमाप झाले पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रशासनाने सुरू केलेल्या मालमत्तांना नवीन क्रमांक तसेच मालमत्तांचे नव्याने करनिर्धारण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मागील दोन दिवसात दोन हजार ७२६ मालमत्तांचे मोजमाप पूर्ण झाले असून, दोन हजार ९५४ मालमत्तांना नवीन क्रमांक देण्यात आला आहे.

आयुक्त सोमनाथ शेटे यांनी नव्याने करनिर्धारण मोहीम सुरू केली. या मोहिमेला फेब्रुवारी महिन्यात प्रारंभ करण्यात आला. ही मोहीम दक्षिण झोनपासून सुरू करण्यात आली. एक एप्रिलनंतर ही मोहीम संपूर्ण महापालिका क्षेत्रात राबवली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. या महिन्यातच संपूर्ण शहरात नव्याने मालमत्तांना क्रमांक देणे तसेच नव्याने करनिर्धारण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी एकूण ७१ टीम तयार करण्यात आल्या आहेत. १५ टीम मालमत्तांना क्रमांक देण्याचे काम करणार तर, ५६ टीम नव्याने करनिर्धारणाचे काम करणार आहेत. या सर्व टीम २९ एप्रिलपासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ही मोहीम आयुक्त सोमनाथ शेटे यांच्या आदेशान्वये तसेच उपायुक्त माधुरी मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.

या मोहिमेत महेंद्र जुनगडे, सूर्यप्रकाश गावंडे, श्रीकांत जवंजाळ, संजय पाचपोर, गणेश चव्हाण, एन.आर.साखरे, उदयसिंग ठाकूर, हरिदास चव्हाण, भास्कर व्यवहारे, दीपराज महल्ले, दिनेश लांडे, दिनेश देहलीवाले, महेंद्र इंगळे, राजेंद्र गाडगे, मनोहर बैस, मोहन गिरी, राजेंद्र दांदळे, जितेंद्र रणपिसे, महंमद नदीम, मिलिंद वानखडे, संतोष वेले, रफीक भाई, राजेश घवंडकर, प्रेम खंडारे, लक्ष्मण ढवळे, दिलावर खान, प्रकाश मालघे, विनोद कोरपे, यशवंत दुधाडे, राजेंद्र पराते, नरेश रानीवाल, मुदस्सर अहमद, दादाराव सदांशिव, अरुण बोरकर, संतोष साबळे, राम पुरकर, नागोराव दुभोले, सुशील ओवे, विजय जायभाये, शंकर शिरसाट, श्रीकृष्ण कडू, संजय कथले, सुनील इंगळे, राजू प्रधान, ज्ञानेश्वर कोकाटे, गोपाल मुळे, गजानन सांगळे, गजानन दलाल, संतोष पांडे, प्रकाश भागवत, खुशाल तळेकर, विवेक मुंगी, आर.आर.वानखडे, संतोष सूर्यवंशी, ईश्वर नरवाडे आदी सहभागी झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...