आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा - ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या घोषणा देत धनगर समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मागणीसाठी सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर 4 ऑगष्ट रोजी सकाळी 11 वाजता मेंढयांसह मोर्चा नेण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने तहसीलदार संतोष कणसे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत धनगर समाजाला नवीन सुधारणा 1976 मध्ये घटना क्र 36 वर अनुसूचित जमातीमध्ये ठेवले आहे. महाराष्ट्र शासनाने अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. यामुळे समाजबांधव अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित आहेत. धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असून आपण केंद्र शासनाला शिफारस करून सवलत मिळून देण्यात यावी, अशी मागणी यावेळी समाजबांधवांमार्फत करण्यात आली. धनगर समाज हा आपल्या पारंपरिक वेशभुषेत तसेच सोबत शेळयामेंढयांचे कळप घेऊन हजर होते. दरम्यान मोर्चात शिवसेना, मनसे, तसेच राष्ट्रवादी च्यावतीने पाठिंबा देण्यात आला. या मोर्चात अल्का गोडे, विजय खरात , अँड सुरेखा गोरे , अरूण मखमले, शशिकांत खेडेकर, विनोद वाघ, विष्णू मेहेत्रे,सतीश काळे, देवीदास ठाकरे, फकीरा जाधव, कोंडीबा जाधव, हेमराज म्हस्के, रामदास बनसोड, हरीदास म्हस्के, बाबासाहेब जाधव, भाऊ जाधव, सदानंद बनसोड, अशोक जाधव आदी उपस्थित होते.