आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Public Works Department,Latest News In Divya Marathi

क्षतिग्रस्त यादीत चांगले रस्ते येतात तरी कसे ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यादीनुसार शहरातील क्षतिग्रस्त रस्त्यांचा समावेश असला तरी त्यात अनेक ठिकाणचे चांगले रस्तेही दाखवले आहेत. त्यामुळे क्षतिग्रस्त रस्त्यांच्या यादीत चांगले रस्ते आले कसे, असा सवाल उपस्थित करून ही तर चक्क नागरिकांच्या पैशांची उधळपट्टीच असल्याची तीव्र प्रतिक्रिया शहरवासीयांतून उमटू लागली आहे.
शहरातील क्षतिग्रस्त रस्त्यांच्या यादीत दुरुस्तीसाठी प्रस्तावित रकमेचा उल्लेख करण्यात आला आहे. यादीनुसार रस्त्यांची पाहणी केली असता क्षतिग्रस्त रस्त्यांसोबतच सुस्थितीतील रस्त्यांवरही खर्च होणार असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला असता त्यांनी यादीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा सूर निघाला. मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सादर करण्यात आलेल्या यादीनुसार टिळक मार्गावरील गणपती मंदिर ते डॉ. पनपालिया यांच्या दवाखान्यापर्यंतचा मार्ग व तेथून बीएसएनएल ऑफिसपर्यंत असणार्‍या रस्त्यांच्या दुरुस्तीवर एक कोटी 12 लाख 22 हजार 824 रुपये खर्चाची रक्कम प्रस्तावित करण्यात आली आहे. या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. बाजारपेठेच्या भागात मार्ग येत असल्याने जड वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. परंतु, या मार्गासोबतच जुने शहरातील दगडी पूल ते टिळक मार्गावरील गणपती मंदिरपर्यंतच्या रस्त्याचीदेखील दुरुस्ती करण्यात येणार आहे. हा रस्ता सुस्थितीत असून, यावर काही ठिकाणीच तेवढे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे बुजवून डागडुजी करणे आवश्यक आहे. मात्र, दुरुस्तीचा खर्च 19 लाख 88 हजार 749 रुपये खर्चाची रक्कम दाखवल्याबद्दल तीव्र नाराजीची व्यक्त करण्यात आली आहे.