आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pulmonary Diseases Issue At Akola, Divya Marathi

अकोल्यात 20 हजार रुग्ण फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बदलती जीवनशैली, बदलते हवामान, वाढती धूळ, जाळलेल्या कचर्‍याचा धूर आणि इतर प्रदूषणामुळे दिवसागणिक दमा व श्वसन विकाराने अनेक जण त्रस्त होत आहेत. श्वसनविकाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत असून, अकोल्यात सुमारे 20 हजार रुग्ण फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त आहेत, अशी माहिती फुप्फुसव श्वसन विकार, फुप्फुस व श्वसननलिका तज्ज्ञ व दुर्बीण परीक्षक डॉ. अनिरुद्ध भांबुरकर यांनी दिली.
अस्थमा या आजाराचे रोगनिदान व जनजागरण समाजात होऊन हा आजार नष्ट व्हावा, या उद्देशाने डॉ. अनिरुद्ध भांबुरकर यांनी सोमवार, 5 मे रोजी पत्रकार परिषद आयोजित केली. ते म्हणाले की, फुप्फुसाच्या विकारास बदलती जीवनशैली जबाबदार आहे. त्याचप्रमाणे वाढते प्लास्टिक व रासायनिक वस्तूंचे प्रमाण, वाहतूक व इतर प्रदूषण यामुळे दिवसागणिक दमा व श्वसन विकार, फुप्फुस विकारामध्ये तिपटीने वाढ होत आहे.
अकोल्यात दरवर्षी 20 हजार रुग्ण आढळतात, तर भारतात हे प्रमाण 15 ते 20 दशलक्ष रुग्ण एवढे आहे. यामध्ये पुरुषांची संख्या 65 टक्के, तर स्त्रियांची संख्या 35 टक्के आहे. जगात सातव्या क्रमाकांवर असलेला श्वसन विकार आता तिसर्‍या क्रमांकावर पोहचला असून, जागतिक संघटनेनुसार 20 ते 22 हजार रुग्ण या आजारांना बळी पडत आहेत, अशी माहिती डॉ. अनिरुद्ध भांबुरकर यांनी दिली.

अशी घ्यावी काळजी
प्रदूषणासोबत आंबट व थंड पदार्थ टाळणे व संतुलित र्मयादापूर्ण आहार घेणे, नियमित शारीरिक व्यायाम करणे.
फुप्फुसाच्या विकाराची कारणे
वाढते प्रदूषण, धूळ, धुराच्या संपर्कात आल्याने वारंवार सर्दी होणे, शिंका येणे, खोकला येणे, कफ वाढणे, श्वासोच्छासाचा विकार होणे, गिट्टी खाणीमध्ये काम करणारे मजूर, अनेक वष्रे प्रदूषित हवेत काम करणे, नेहमी कापसाच्या संपर्कांत राहणारे शेतकरी, सिमेंट, कापड उद्योग, रासायनिक, बांधकाम क्षेत्र, धूम्रपान करणार्‍या व्यक्ती, आनुवांशिकता असणार्‍या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते.
ही आहेत आजाराची लक्षणे
जुना खोकला राहणे, कफ पडणे, श्वासोच्छासाचा त्रास होणे, छाती भरणे व खरखर करणे, कोरडी ढास लागणे, फुप्फुसाचा त्रास तीव्र प्रमाणात जाणवणे.