आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णा-उमा बॅरेज पाइप कालव्याचे काम थंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - खारपाण पट्ट्यातील पूर्णा आणि उमा बॅरेज या प्रकल्पातील पाईप कालव्याला जल नियामक प्राधिकरणाने २०११ ला मंजुरी दिल्या नंतरही अद्यापही पाईप कालव्याच्या कामाला प्रारंभ झाला नाही.

हे दोन्ही प्रकल्प खारपाणपट्ट्यातील आहे. खारपाणपट्टा भागात जमिनीत क्षाराचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोणतेही बांधकाम करताना अतिरिक्त खर्च येतो. या दोन्ही प्रकल्पा अंतर्गत प्रथम कालव्याच्या माध्यमातून जुन्या पद्धतीनुसार सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या पारंपारिक पद्धतीनुसार सिंचनासाठी पाणी सोडल्यास या पाण्यात जमिनीतील क्षार मिसळतील तसेच कालव्या खचण्याचे प्रमाणही वारंवार होईल, ही बाब लक्षात घेऊन पारंपारिक कालवा पद्धती ऐवजी पाईप पद्धतीनुसार सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या नव्या निर्णयाला जल नियामक प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक होती. जल नियामक प्राधिकरणाने २०११ मध्येच या नव्या योजनेला मंजुरी दिली. त्यामुळे पाईप टाकण्याचे काम सुरु होईल, अशी अपेक्षा व्यक्त केल्या गेली होती. परंतु अद्यापही पाईप टाकण्याच्या कामाला प्रारंभ झालेला नाही. विशेष म्हणजे पूर्णा बॅरेजचे काम ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असताना पाईप टाकण्याचे काम अद्यापही सुरु झाल्याने प्रकल्प पूर्ण झाल्यास पाईप प्रणालीचे काम झाल्यास खारपाणपट्ट्यातील हा प्रकल्प शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी देऊ शकणार नाही. त्यामुळे पाईप प्रणालीचे काम केव्हा सुरु होणार? याबाबत लाभार्थ्यांमध्ये चर्चा सुरु आहे.