आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटांमध्ये वाद; वाहनांची तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- युवकांच्या दोन गटात वाद झाल्याची घटना रेल्वेस्थानक परिसरात 1 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता घडली. या वेळी वाहनतळावरील वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती कळताच रामदासपेठ पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

रामदासपेठ पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या रेल्वेस्थानक परिसरातील वाहनतळावर चार ते पाच युवकांमध्ये वाद झाला. काही वेळातच वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. युवकांनी एमएच-28-एस-2187, एमएच-वाय-6892 या दोन दुचाकींसह एका ऑटोरिक्षाची तोडफोड केली. एका दुचाकीचे इंधन टँकचे प्रचंड नुकसान झाले. हाणामारीत एक जण जखमी झाला. याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

वर्चस्वाची किनार
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युवकांच्या दोन गटांमध्ये रेल्वेस्थानक परिसरावर वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून वाद सुरू आहे. या वादातूनच ही घटना घडली असावी तसेच ऑक्टोबर महिन्यात तापडियानगरात झालेल्या तोडफोडीचा संबंध या घटनेशी आहे काय, याचाही पोलिस शोध घेत आहेत.