आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानाच्या वाढत्या स्पर्धेतही टिकले श्रोत्यांचे रेडिओ प्रेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पूर्वी दिवसभराच्या कामानंतर रात्री मंद आवाजात कानाच्या शेजारी ट्रान्झिस्टर ठेवून निवांत गाणे ऐकणारे, हातात रेडिओ घेऊन शेतावर निघालेले मित्र, क्रिकेटच्या सामन्याचे धावते समालोचन ऐकण्यासाठी झालेली गर्दी हे सर्वसामान्य चित्र होते. मात्र, कालांतराने ते दुरापास्त झाले. वाढत्या वाहिन्यांच्या स्पर्धेने रेडिओ हद्दपार होतो की काय, असे वाटत होते. मात्र, एफएमने पुन्हा नवीन पिढी जुळली अन् मोबाइलमुळे तो प्रत्येकाच्या पाकिटात येऊन बसला. २० ऑगस्टला श्रोता दिन साजरा होत असून, त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.
कुठलाही कार्यक्रम अन् कार्यक्रमाची यशस्वीता अवलंबून असते ती श्रोत्यांवरच. आयोजक, वक्ता, कवी असो वा गायक त्याला लागतो तो श्रोताच. श्रोत्यािवना कुठलाही कार्यक्रम जिवंत होऊ शकत नाही. आज इंटरनेटच्या प्रचार व प्रसारामुळे आकाशवाणीचा श्रोता हरवला का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, आजही मोठ्या संख्येत आकाशवाणीचे श्रोते आहेत. श्रोते आणि आकाशवाणीचे नाते फार घनिष्ठ आहेत. आज मीडियाने केलेली प्रगती, जाहिरातींची स्पर्धा अशात रंगीत टीव्हींसमोर रेडिओ तग धरेल काय, हा प्रश्न होता. मात्र रेडिओ आणि त्याचे श्रोते यांच्यात कमी आलेली नाही. वाऱ्याच्या लहरींमधून ध्वनी जाणे व तो आदळणे याला ऑल इंिडया रेडिओ असे सर्वसामान्यपणे म्हणता येईल. आकाशातून या लहरी कुठलेही कनेक्शन नसता केवळ हवेच्या साहाय्याने दूरवरचा प्रवास करतात म्हणून आकाशवाणी, असे आपण संबोधतो. आज देशभरात आकाशवाणीचे असंख्य श्रोते आहेत. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार गाणे ऐकणाऱ्यांची मोठी संख्या आहे. आजही अनेकांना पत्र पाठवून आपली आवड आकाशवाणीच्या कार्यक्रमात समािवष्ट करण्याची धडपड असून, तसे घडल्यास मोठा आनंद होतो. आज विविध भारती, सिलोन, मीिडयमव्हेज व एफ.एम.च्या माध्यमातून रेडिओ स्टेशन आहेत. केंद्र शासनाने एफ.एम. रेडिओची निर्मिती करून प्रत्येक जिल्ह्याला आपली वेगळी ओळख दिली. या एफ.एम.ची रेंज १०० किलोमीटरपर्यंत असते. त्यामुळे ते जिल्हापुरते मर्यादित राहते. मात्र, एफ.एम.ने आजच्या तरुणाईला भुरळ घातली आहे. 'दिवसभर आपल्या कामाच्या व्यापातही अनेक जण मोबाइलवर उपलब्ध असलेल्या या एफ.एम.च्या साहाय्याने विरंगुळ्याचा क्षण शोधतात. अनेक नवीन, जुनी गाणी, आवडत्या कलावंताशी गप्पा, मुलाखती ऐकतात.
श्रोता दिनाला अशी झाली सुरुवात : श्रोता दिन केवळ भारतात पाळला जातो. २००८ पर्यंत हा श्रोता दिन वेगवेगळ्या राज्यांमध्ये, जिल्ह्यात वेगवेगळ्या तारखांना साजरा होत होता. मात्र, अोल्ड लिस्नर्स ग्रुप ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र मोदींनी त्यासाठी पुढाकार घेत देशभरातील श्रोत्यांची मोबाइल काॅन्फरन्स घेतली. यामध्ये सर्वसंमतीने २० ऑगस्टला पसंती देण्यात आली. २० ऑगस्टच निवडण्यामागे एक कारण होते. याच दिवशी मुंबईची टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीवरून २० ऑगस्ट १९२१ ला पहिले रेडिओ प्रसारण झाले होते.
श्रोताच असतो आत्मा

श्रोता दिन हा श्रोत्यांना स्मरणाचा 'दिवस असून, श्रोताच आत्मा असतो. श्रोत्यांमध्ये परस्पर प्रेम, जिव्हाळा निर्माण होण्यासाठीच हा दिवस पुढे आला. आजही या 'दिवसाला अनेक जण एकमेकांना शुभेच्छा देतात. रेिडआेवरील मािहतीवर श्रोत्यांचा विश्वास आहे व कायम राहील.''
बाळ बिडवई, अस्थायी उदघोषक, आकाशवाणी