अकोला - कोकणातील नागोठणे जवळ रविवारी दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचे चार डब्बे रुळावरून घसरून अपघात झाला. यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. पण, अकोला मार्गे जाणार्या गाड्या सुरळीत सुरू होत्या.
या अपघातामुळे कोकण रेल्वेच्या काही गाड्या रद्द झाल्या. सर्वच गाड्या उशिराने धावल्या. दरम्यान, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले. पण, मार्ग बदलेली एकही गाडी रविवारी अकोला मार्गे धावली नाही. शिवाय मुंबईकडून अकोला मार्गे जाणारी एकही गाडी रद्द झाली नाही, असे असताना हावडा ते लोकमान्य टिळक टर्मिनल ही अतिजलद गाडी तिच्या निर्धारित वेळेपेक्षा सहा तास उशिराने धावली. पण, त्या मागे अपघाताचे कारण नव्हते.