आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे मालधक्क्यावर माल उघड्यावर; पावसाळ्यात माल ठेवण्याची सोय नसल्यामुळे होते पंचाईत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मालवाहतुकीतून रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न होत असले तरी रात्री-बेरात्री केव्हाही येणारी रॅक रिकामी करुन घेण्याची जबाबदारी मात्र कंत्राटदाराची हे. मालधक्क्यावर पावसाळ्यात माल ठेवण्याची सोय नसल्यामुळे पंचाईत होत आहे. अकोला क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट असोसिएशनने याबाबत सतत पाठपुरावा करुनही अद्याप रेल्वेने त्याची दखल घेतलेली नाही.

पूर्वी सकाळी 6 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत रेल्वे रॅकने येणारा माल उतरविता येत होता. आता चोवीस तासात केव्हाही माल आला तरी दिलेल्या वेळेत तो उतरलाच पाहिजे नाही तर कंत्राटदारांना डॅम्रेज भरावे लागते. अकोल्यात माथाडी बोर्डाचे नियम लागू असल्याने रात्री मजूर काम करीत नाहीत. रात्री 8 वाजेनंतर काम बंद होते. त्यामुळे चोवीस तास काम होऊच शकत नाही. चार वर्षांपूर्वी तत्कालीन विभाग प्रबंधक अकोल्याला आले असताना असोसिएशनच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चोवीस तास माल उतरवण्याची अट काढून टाकावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी डीआरएम यांनी ही पद्धत कायमस्वरुपी नाही, असे म्हटले होते. मात्र, आता ती कायम झालेली असल्याने आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे, असे संघटनेच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.

मालधक्क्यावर माल खाली करण्यासाठी जागा राहिली नाही तर तो ठेवावा कुठे हा प्रश्न आहे. तसेच माल रिकामा करण्यास विलंब झाला तर 150 रुपये प्रति तास प्रती वॅगन डॅम्रेज भरावा लागतो. पावसाळ्यात माल कुठे उतरावायचा ही समस्या असते. गेल्या तीन चार वर्षांपासून हा प्रश्न भेडसावतो आहे. माल उघड्यावर ठेवूनच नंतर त्याची उचल करावी लागते. यामध्ये मालाचे नुकसान होते. तसेच धक्क्यावर दोन-तीन वॅगन लागल्या तर माल उतरवायला वेळ लागतोच. ही जबाबदारी कंत्राटदारांवर टाकण्यात आली आहे. रेल्वेच्या वाणिज्य विभागाने
याकडे लक्ष द्यायला हवे.

लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रॅकची क्षमताही वाढवण्यात आली आहे. आता येणाºया रॅकमध्ये 81 हजार पोती सिमेेंट येते. बीसीएन रॅकमध्ये 62-63 टन माल यायचा, आता 70 टन येतो आहे. तसेच नवीन प्रकारचा बीसीएन-एचएल रॅकची क्षमता अधिक असल्याने त्यात बराच माल येतो. रेल्वेने मध्यंतर डॅम्रेज आणि वार्पेज चार्जेस 600 टक्के वाढवले होते. याविरुद्ध संघटनेने आवाज उठवल्यामुळे 12 जून पासून हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. सर्क्युलर काढून पूर्ण तयारी रेल्वेने केली होती परंतु त्यास ब्रेक लागला आहे.
डॅम्रेज : निर्धारित वेळेत माल उतरवला नाही तर रेल्वे त्यासाठी डॅम्रेज आकारते. रेल्वेने दिलेल्या वेळापत्रकानुसार कंत्राटदारांना माल उतरवणे बंधनकारक असते.
वार्पेज : मालाची उचल करायला 12 तास मिळतात. त्या काळात मालाची उचल झाली नाही तर वार्पेज (स्थानक शुल्क) कंत्राटदारांना द्यावे लागते.
माहिती देऊ शकत नाही : या संदर्भात रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोळे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही काहीही माहिती देऊ शकत नाही, असे सांगितले.
माल ठेवण्यासाठी जागा हवी
४ 24 तास वॅगन रिकामे करण्याची अट रद्द करावी, पावसाळ्यात सुरक्षित जागी माल ठेवण्याची सोय करुन द्यावी. ज्यामुळे माल सुरक्षित राहील तसेच सध्या होत असलेला त्रास वाचेल.’’
रमाकांत कानुनगो, पदाधिकारी, अकोला क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट असोसिएशन