आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या नियमांसह सुविधांमध्ये झाले बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव - रेल्वेमध्ये दिवसेंदिवस मोठा बदल होत असून, प्रवाशांच्या हितासाठी अजूनही बरेच काही करण्याजोगे आहे, अशा परिस्थितीत रेल्वे सुविधा नियमांमध्ये जुलैपासून अनेक बदल झाले आहेत. ते प्रवाशांसाठी लाभदायक ठरत आहेत.

जलद आणि कमी खर्चामध्ये प्रवासाचे साधन म्हणजे रेल्वे. त्यामुळेच रेल्वेची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. प्रवाशांना रेल्वेगाडीत बसायलाच काय तर उभे राहण्यासाठीही जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक जण आरक्षित तिकीट घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, प्रवाशांना प्रतीक्षा तिकिटावरच समाधान मानावे लागते. यामुळे रेल्वेने आता केवळ आरक्षित तिकीटच देण्याचा निर्णय घेतला असून, प्रतीक्षा तिकिटाच्या त्रासातून त्यांची मुक्तता झाली आहे. तत्काळ तिकीट रद्द केल्यास आधी कोणताच परतावा मिळत नव्हता. आता ५० टक्के परतावा मिळत आहे. तत्काळ तिकीट नियमातही बदल करण्यात आलेला असून, सकाळी १० ते ११ एसी डब्याचे तिकीट बुकिंग होणार आहे तसेच ११ ते १२ या वेळेत स्लीपर डब्याचे तिकीट घेता येणार आहे

प्रवाशांचा तिकिटासाठीचा त्रास लक्षात घेता राजधानी शताब्दी रेल्वेगाडीत पेपरलेस तिकीट सुविधा सुरू झाली असून, हे तिकीट मोबाइलवर प्राप्त होत आहे. त्यामुळे पेपर तिकीट बंद झाले.
सुविधा रेल्वेगाडीचे तिकीट परत केल्यास ५० टक्के प्रवासभाड्याची रक्कम मिळत आहे. तसेच एसी-२ वर १०० रुपये, एसी-३ वर ९० रुपये आणि स्लीपर गाडीसाठी ६० रुपये कपात होईल.
प्रीमियम रेल्वे गाड्या पूर्णपणे बंद होणार आहेत. तिकीट घेण्यासाठीचा त्रास बघता शताब्दी, राजधानी रेल्वेगाड्यांचे डबे वाढवण्यात येणार आहेत. तसेच राजधानी, शताब्दी, दुरंतो, मेल-एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या धर्तीवर सुविधा रेल्वेगाडी सुरू करण्यात येणार आहे.

हंगामात मिळणार चांगल्या सुविधा
उन्हाळा- हिवाळ्यात प्रवाशांना रेल्वेगाडीत पाय ठेवायलाही जागा मिळत नाही, तर रेल्वेकडून सुविधांही मिळत नाहीत. या गर्दीच्या हंगामात चांगल्या सुविधांसाठी वैकल्पित गाडी समायोजन प्रणाली, सुविधा रेल्वेगाडी सुरू करणे, महत्त्वपूर्ण रेल्वेगाड्यांची प्रतिरूप गाडी सुरू करण्याची योजना रेल्वेच्या विचाराधीन आहे.

वेगवेगळ्या भाषेत येणार तिकीट
रेल्वेगाडीमध्ये प्रवास करण्यासाठी घेतले जाणारे तिकीट सध्या इंग्रजी हिंदी भाषेत मिळते. लवकरच रेल्वे प्रशासन वेगवेगळ्या भाषेत तिकीट देण्याची तयारी करत आहे. नवीन वेबसाइट सुरू होणार असून, यानंतर या सेवेला प्रारंभ होणार आहे.