आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे तिकीट बुकिंग सेवा; बेरोजगारांची पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- तिकीट खिडकीवर गर्दीमुळे प्रवाशांना होणारा त्रास दूर करण्यासोबतच सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकीट बुकिंग सेवकांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते. यामध्ये अकोल्यासह भुसावळ विभागातील 79 रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. मात्र, या योजनेच्या जाचक अटी व शर्तीमुळे बेरोजगारांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

रेल्वे मंत्रालय खासगीकरणाला प्रोत्साहन देत आहे. त्याशिवाय तिकीट खिडकीवर होणार्‍य गर्दीच्या नियंत्रणासाठी खासगी तिकीट विक्री केंद्र उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तिकीट वितरण व्यवस्थेचेही काही प्रमाणात खासगीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार प्रशासनाने सर्वसाधारण तिकीट बुकिंग सेवकांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते. अर्जासाठीच्या मुदतीत अकोल्यासह 79 स्थानकांसाठी 10 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे. अर्जसंख्या कमी असल्याने अर्जाची मुदत वाढवली होती. मात्र, उपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तिकीट बुकिंग सेवक म्हणून नियुक्तीसाठी उमेदवाराकडे संगणक, टेलिफोन, इंटरनेट सुविधा, कॅबिन अशा सुविधाही आवश्यक आहेत. नियुक्तीसाठी सेवकांना एक लाखाची अनामत प्रशासनाकडे जमा करणे आवश्यक आहे. या अटींची पूर्तता करणे उमेदवारांना शक्य नसल्याने रेल्वेच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे.

या आहेत मागण्या
तिकिटामागे मिळतो एक रुपया : सर्वसाधारण तिकीट बुकिंग सेवकांच्या नियुक्तीसाठी प्रशासनाच्या आवाहनास उमेदवारांनी अल्प प्रतिसाद दिला़ सर्वसाधारण तिकीट बुकिंग सेवकांना एका प्रवाशाच्या तिकिटामागे एक रुपयाचा लाभ होतो. त्यात आरक्षण तिकिटांचा समावेश नाही. जनरल तिकिटांसाठी अर्ज मागवण्यात आले होते.

खासगी तिकिटांसाठी या स्थानकांचा होता समावेश : अकोल्यासह भुसावळ विभागातील नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, शेगाव, बडनेरा, खंडवा, मलकापूर, अमरावती, देवळाली, मूर्तिजापूर, नेपानगर, निफाड, कारंजा, माना, खामगाव, भादली, जामनेर या स्थानकांसह ‘अ’, ‘ब’, ‘ड’ आणि ‘ई’ र्शेणीतील इतर रेल्वेस्थानकांचा समावेश आह़े

छाननीनंतरच होणार निर्णय
बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून प्रशासनाने ही योजना अमलात आणली आहे. मात्र, त्याला समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही़ अर्जांची छाननी करून नंतरच निर्णय घेतला जाईल.’’ एन. जी. बोरीकर, वरिष्ठ प्रबंधक, वाणिज्य विभाग, भुसावळ