आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसामुळे मूर्ती वाळवण्यासाठी मूर्तिकारांची उडतेय तारांबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गणपती बाप्पांच्या स्वागताच्या तयारीला वेग आला असला तरी, पावसामुळे यंदा बाप्पांची मूर्ती महागणार असल्याचे चित्र आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे मूर्ती वाळवणे कठीण झाले असून, रंगकामात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

अधिक मागण्या नोंदवून मूर्ती वेळेत पूर्ण करून देणे शक्य नसल्याने मूर्तिकारांचे नुकसान तर होतच आहे. मात्र, यंदा लहान गणेश मूर्तींची कमतरता जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गणेशमूर्तींच्या कामाला गणेशोत्सवाच्या दोन महिनेआधीच मूर्तिकार सुरुवात करतात. यामध्ये दूरवरच्या मोठय़ा गणेश मंडळाच्या पाच फुटांपेक्षा अधिक आकाराच्या गणेशमूर्तींचे काम हाती घेतले जाते. मात्र, यंदा पावसाने उघाड न दिल्याने मूर्तींची निर्मिती मंदावली आहे. मूíतकारांनी तयार केलेल्या मूर्ती वाळत नसल्याने रंगरंगोटी करणे शक्य होत नाही. त्यामुळे मूर्तिकार चिंतित असून, त्यांच्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. दरवर्षीपेक्षा यंदा 40 टक्क्यांनी मूर्तींची निर्मिती कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

छोट्या मूर्तींची कमतरता
यंदा पावसाने मूर्तिकारांची तारांबळ उडवली असून, मूर्तींर्ंची निर्मिती निम्म्यावर आली आहे. 10 ते 15 टक्क्यांनी गणेशमूर्ती निर्मिती साहित्याच्या किमतीत वाढ झाली असून, यंदा मूर्तींर्ंची संख्याही कमी राहणार असल्याने भाववाढ होणार आहे. तसेच बाहेरगावाहून येणार्‍या मूर्तींचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
- विजय खेते, मूर्तिकार, श्रीराजराजेश्वर मंदिर

शेकोटीचा आधार
जिल्हय़ाला पावसाने झोडपले असून, सूर्याचे दर्शन घडत नसल्याने मूर्ती सुकवणे कठीण झाले आहे. माझ्याकडे 25 मोठय़ा मूर्तींची मागणी असून, त्या मी तयार केल्या आहेत. मात्र, त्या वाळत नसल्याने कसरत करावी लागत आहे. हिटर, लाकडे पेटवून आगीच्या साहाय्याने या मूर्ती वाळवणे सुरू आहे.
- सुरेश अंबेरे, मूर्तिकार, गुलजारपुरा