आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला जिल्ह्यात 11 मिलिमीटर पावसाची नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे मागील आठवड्यात एका दिवसात 11 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वात जास्त पाऊस अकोट तालुक्यात झाला. मागील तीन महिन्यांत सरासरीपेक्षा पाऊस अधिक झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे. मागील तीन महिन्यांत सर्वाधिक पाऊस पातूर तालुक्यात झाला आहे. त्याखालोखाल तेल्हारा, बार्शिटाकळी, अकोला व मूर्तिजापूर तालुक्यात झाला आहे. सर्वात कमी पाऊस अकोट तालुक्यात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच मागील 24 तासांत अकोला तालुक्यात 2.00 मि.मी. पाऊस झाला आहे.

अकोट तालुक्यात 4.02 मि.मी., मूर्तिजापूर तालुक्यात 2.00 मि.मी. पाऊस झाला आहे. बार्शिटाकळी, बाळापूर व पातूर तालुक्यात पावसाची नोंद निरंक करण्यात आली आहे. या पावसाची एकूण सरासरी 1.57 मि.मी.ने काढण्यात आली आहे. मागील तीन महिन्यात झालेल्या पावसाची एकूण सरासरी 757.91 मि.मी.ने काढली आहे. वान प्रकल्पाचे चार तर दगडपारवा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे.

जिल्हाधिकार्‍यांची बैठक
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी घेतली. त्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांकडून माहिती घेतली.