आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचा जिल्हाभर कहर, शेतीचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. या वेळी शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. अकोल्यासह अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा आणि पातूर, बार्शिटाकळी तालुक्यात संध्याकाळी वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. तासभर चाललेल्या पावसाने अनेकांच्या स्वप्नावर पाणी फेरले.
सध्या शेतकऱ्यांचा गहू, हरभरा या पिकांची सोंगणी करून तयार आहे. तसेच टरबूज, कांदा, कांद्याचे बी, उन्हाळी भुईमूग, लिंबू, आंब्याचे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर अकोट तालुक्यात झोपडीवर झाड कोसळल्यामुळे मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत गारपीट झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती, तर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. गेल्या महिन्यामध्ये दोन वेळा झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
अवकाळीपाऊस अन् विजेचा लपंडाव
शहरातअनेक भागात विजेचा लपंडाव सुरू झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते, मात्र सायंकाळी साडेसातपर्यंत काही भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला होता. पावसाला सुरुवात होताच महावितरणच्या सबस्टेशन फीडरवरील न्यू तापडियानगर, उमरी, विद्युत भवनाचा परिसर या भागातील वीज गुल झाली.
याभागातील वीजपुरवठा प्रभावित
सोसाट्याच्यावाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वीज वाहिनीचे तार तुटून पडले. त्यामुळे बिर्ला कॉलनी, खदान, मोहता कॉटन मार्केट आणि खडकी हे सर्व फिडर बंद होते. परिणामी, या फिडरवरून वीज पुरवठा होत असलेल्या भागांतील वीज प्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
महानपरिसरात गारपीट
महानयेथून पाच कि. मी. अंतरावर असलेल्या निंबारा येथे शनिवारी सायंकाळी वाजता वादळी वाऱ्यासह पावसासोबतच हरभऱ्याऐवढी गार पडली. अवकाळी पावसामुळे आंबा,लिंबू , कांदा, भुईमुंग, संत्रा आदींसह अनेक पिकांचे नुकसान झाले.
घोडेगाव येथे टरबुजांचे नुकसान
तेल्हाराशहरासह तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले. वादळामुळे अनेक घरांवरची टिनपत्रे उडून गेलीत. घोडेगाव येथे टरबुज पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे उद्या, १२ एप्रिल रोजीचा पाणीपुरवठाही विस्कळीत होणार आहे.


सिव्हिल लाइन परिसरात झाडे उन्मळून पडली
सायंकाळीवादळी पावसामुळे अशोक वाटिका सिव्हिल लाइन परिसरात दोन झाडे उन्मळून पडली. दरम्यान, वादळामुळे रस्त्याच्या कडेने असलेल्या घाऊक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. अशोक वाटिकेत असलेल्या तीन बदामाच्या झाडांपैकी एक झाड वादळामुळे उन्मळून पडले, तर सिव्हिल लाइन भागात असलेल्या पूर्वा सद््निकेसमोर एक कॅशियाचे झाड उन्मळले.
शनिवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली.

जामठी बु. परिसरात झालेल्या पावसामुळे धामोरी येथील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडालीत. सुरेश रामकृष्ण राऊत यांच्या घरावर झाड मोडून पडले. घरावरील ओसरीवरील दहा टिन उडालीत. सुसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भिंतीही खचून पडल्या आहेत. गणेश बोबडे, पद्माकर ठाकरे, पंचफुला राऊत, जगन ठाकरे, सावतराम राऊत यांच्या घरावरीलसुद्धा टिनपत्रे उडालीत. ११ एप्रिल रोजी सकाळी सरपंच प्रतिभा बोळे, माजी सरपंच डिगांबर साऊतकर, तलाठी चाटे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून कुटुंबियांस धिर दिला.
वादळी वाऱ्याने झाड उन्मळून घरावर पडल्याने ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. सुदैवाने त्याची पत्नी दोन लहान मुले वाचली. शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वा ऱ्यासह तुरळक पाऊस झाला. अंजनगाव मार्गावरिल सन इन बिअरबारच्या मागे राहणारे मनोहर हेंड हे कुटुंबियांसह घरीच होते. सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला. त्यामुळे घराजवळील कडूलिंबाचे झाड उन्मळून पडले. त्यामध्ये मनोहर हेंड यांचा झाडाखाली दबून मृत्यू झाला. घरात त्यांच्यासोबत असणारी त्यांची पत्नी दोन, लहान अपत्य मात्र सुखरूप आहेत. सायंकाळी झालेल्या पावसामुळे बाजारपेठेत दाणादाण उडाली.
पिंजर परिसरातील मोझरी खुर्द, वडगाव, पार्डी, पराभवानी, खेर्डा भागाई, भेंडीमहाल, निहीदा, बहिरखेड, महागाव, भेंडगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, कांदा, आंबा, निंबू इतर पिकांचे तसेच घरांचे, जनावरांचे नुकसान होत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. विद्युत यंत्रणाही कोलमडली आहे. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत अंधारात राहावे लागले.
सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान वादळी हवेसह गारपीट होऊन कांदा, लिंबू, आंबा आदी पिकांसह विटा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खामखेड येथील हनुमान मंदिराच्या छतावरील टिनपत्रेसुद्धा उडून गेल्याचे वृत्त असून, बाळापूर बसस्थानकास तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र, तालुक्यात कुठेही जिवीत हानी झाली नाही. अनेक वृक्ष वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर कोसळल्यामुळे काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती. पारस-निमकर्दा रोडवर झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. बाळापूर शहरातील खामखेड परिसरातील अनेक घरावरची टिनपत्रे उडून गेले. काही घरांची पडझड झाली. शहरात बोराएवढी गार पडली असून, तालुक्यात वाडेगाव, व्याळा, उरळ, हातरुण, लोहारा, निंबा, पारस आदी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

सायंकाळी ५.३० वाजता पावसाची सुरुवात झाली. पावसामुळे कास्तकारांचे आंबा, कांदा, गहू आदी रब्बी पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील बोडखा, िचंचखेड, कोठारी, खानापूर, विवरा, आलेगाव, देऊळगाव बाभुळगाव येथेसुद्धा पावसाने आपली हजेरी लावली. अवकाळी पावसाने मात्र कास्तकारांचे कंबरडे मोडले आहे. वादळी पावसामुळे काही ठिकाणचे वृक्ष उन्मळून पडले.