आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rajiv Gandhi Empowerment Campaign,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्हणे, पुरावे आयुक्तांना देऊ, चौकशीचे आदेश देत सभा गुंडाळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राजीवगांधी सशक्तीकरण अभियानाच्या नोकरभरतीत झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यात तक्रारकर्ते सदस्य अपयशी ठरले. आरोपकर्त्यांचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख गैरहजर असल्याने सदस्य चांगलेच तोंडघशी पडले. तर अध्यक्ष शरद गवई यांनी सारवासारव करीत िवभागीय आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देत सभा आटोपती घेण्यात आली.
जिल्हा परिषद पंचायत समिती अधििनयम १९६१ चे कलम १११, नुसार जिल्हा परिषद प्रशासनाने िवशेष सभा बोलवावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या १३ सदस्यांनी केल्याने राजीव गांधी सशक्तीकरण अभियानांतर्गत पदभरतीची चौकशी करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच २२ सप्टेंबर रोजी िवशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात कंत्राटी पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज बोलावण्यात आले होते. प्राप्त झालेल्या २५० अर्जांपैकी २०६ पात्र ठरवण्यात येऊन यामधील ६२ उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर कौशल्य चाचणीकरिता िनवड करण्यात आली होती. मात्र, ही सर्व प्रक्रिया सुरू असताना सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख यांच्यासह १३ सदस्यांनी या भरती प्रक्रियेमध्ये घोळ घालून विशेष सभा घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी पार पडलेल्या सभेत या िवषयाचा ऊहापोह करण्यात आला. मात्र, या सभेत आरोपकर्त्या एकाही सदस्याने पुरावे सादर केल्याने सदस्य चांगलेच तोंडघशी पडले. या चर्चेत सदस्य शोभाताई शेळके, दामोदर जगताप, रवींद्र गोपकर, गोपाल कोल्हे आदींनी सहभाग घेतला. राजीव गांधी सशक्तीकरण अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांना जाब विचारताना जिल्हा परिषदेचे गटनेते विजय लव्हाळे इतर सदस्य.