आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस कार्यालय ठेवणार नाही; खासदार राजू शेट्टींचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिखली कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करत संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला तर काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा तथा खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना थेट मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना व चिखली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही दिवसांपासून धुसफूस सुरू असून, त्याचे पर्यावसान 27 जून रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयात तोडफोड करण्यात झाले. परिणामी, चिखलीतील राजकीय वातावरण तणावपूर्ण बनले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची जिल्ह्यातून तडीपारी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर हा वाद सर्वत्र चर्चिल्या जात होता. दरम्यान, 26 जूनला रात्री स्वाभिमानीचे बॅनर फाडणे आणि 27 जूनला कार्यालयाच्या काचांची तोडफोड करण्यात आल्याने हा कथित स्तरावरील वाद चिघळला आहे. तुपकर यांच्या पत्नी अ‍ॅड. शर्वरी तुपकर चिखली येथे 26 जूनच्या रात्री पळसखेड जयंती येथे घडलेल्या प्रसंगासंदर्भात पोलिसांत दिलेल्या तक्रारीची माहिती कथन करत असतानाच दुपारी संघटनेच्या कार्यालयावर दगडफेक होऊन काचा फोडण्यात आल्या. या दोन दिवसांच्या घडामोडींमध्ये अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी रमेश सुरडकर व त्यांच्या सहकार्‍यांविरोधात दोन तक्रारी 27 जून रोजी चिखली पोलिस ठाण्यात दिल्या आहेत. यादरम्यान रमेश सुरडकर यांनीही रविकांत तुपकर व त्यांच्या सहकार्‍यांविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारींवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
रविकांत तुपकर मुंबईत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेश पातळीवरील बैठकीसाठी रविकांत तुपकर सध्या मुंबईत आहेत. त्यांच्याशी सायंकाळी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.
हा संस्कृतीला काळिमा
४संघटनेच्या कार्यालयात अ‍ॅड. शर्वरी तुपकर पत्रकार परिषद घेत असताना झालेला हा हल्ला भ्याडपणाचे लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात स्त्रियांचा मान राखला जात होता. आज याच महाराष्ट्रात स्त्रियांवर असे हल्ले होणे ही राज्याच्या संस्कृतीला काळिमा फासणारी बाब आहे. आमदारांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलेले हे कृत्य निषेधार्ह आहे.’’
सदाभाऊ खोत, प्रदेश कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
काँग्रेसशी संबंध नाही
४या घटनेचा आपण काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करतो. कदाचित वैयक्तिक वादातून ही घटना घडली असावी. मिळालेल्या माहितीनुसार रमेश सुरडकरांच्या तक्रारीवरून रविकांत तुपकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झााला आहे. त्यांच्यातील या वादाचा काँग्रेस व आमदार राहुल बोंद्रेंशी संबंध नाही.’’
डॉ. सत्येंद्र भुसारी, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, चिखली