आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारातील म्युझिकल राख्या ठरताहेत चिमुकल्यांचे आकर्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहरातील बाजारपेठेत रक्षाबंधनानिमित्त रेशीम धाग्यांपासून तयार झालेल्या आकर्षक राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. विविध रंगछटा असणार्‍या राख्यांनी येथील बाजारपेठ सजली आहे, तर बच्चे कंपनींमध्ये म्युझिकल राख्या आकर्षण ठरत आहे. रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे बाजारात राख्यांच्या खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली आहे. बाजारपेठ रेशीम धाग्यांपासून तयार करण्यात आलेल्या राख्यांनी सजली आहे. बाजारपेठेत 7 ते 300 रुपयांपर्यंत किंमत असलेल्या रेशीम धाग्यांपासून बनवण्यात आलेल्या राख्या उपलब्ध आहेत. या राख्यांमध्ये खास आकर्षण लहान मुलांसाठी असणार्‍या राख्यांबाबतीत आहे. राख्यांमध्ये छोटाभीम, बेनटेन, कृष्णा, स्पायडर मॅन, क्रिश आदी काटरून्सचा भडिमार नेहमीप्रमाणे करण्यात आला असला तरी यामध्ये लाइट व म्युझिकल सिस्टिमच्या आकर्षक राख्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. तेव्हा या राखीचे आकर्षण बच्चे कंपनीमध्ये राहणार, हे नक्की.
म्युझिकल राखी अशी
दरवर्षी बच्चे कंपनीसाठी रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत वेगळ्या राख्या येत असतात, तर यंदा बच्चे कंपनीसाठी खास म्युझिकल राखी बाजारपेठेत आली आहे. या मुझिकल राखीमध्ये बच्चे कंपनींमध्ये गाजलेली गाणी तसेच धार्मिक गाणी बटण दाबताच वाजायला लागतात. तर, गाण्यांच्या तालावर विविध आकर्षक रंगांचे लाइटदेखील लागतात.
खरेदी दिल्लीहून
बाजारपेठेमध्ये आलेल्या रेशीम धाग्यांच्या आकर्षक राख्यांची खरेदी कोलकाता, दिल्ली आणि अहमदाबाद आदी ठिकाणांहून करण्यात येत असून, रेशीम धागा महाग झाल्याने राखीचे भाव 4 टक्के वाढले आहे. मजबूत रेशीम धाग्यांपासून तयार करण्यात आलेल्या राखीला ग्राहकांची पसंती मिळत आहे, तर बच्च्े कंपनीसाठी म्युझिकल सिस्टिम असलेली राखी आकर्षण ठरत आहे.’’ रमेश पटवी, राखी विक्रेता