आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदास बोडखे यांची संपत्ती ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला/अकोट - माजी रोजगार हमी मंत्री रामदास बोडखे यांनी मंत्रिपदावर असताना लाखो रुपयांची माया जमवली. त्याप्रकरणी मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकार्‍यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. रामदास बोडखे यांची तक्रार एसीबीकडे करणारे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे यांनी मात्र बोडखेंनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ३० कोटी रुपयांच्या वर संपत्ती जमवल्याचा आरोप केला असून, पोलिसांनी बोडखे कुटुंबीयांना तत्काळ अटक करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.

रामदास बोडखे यांनी अपहार करून त्या वेळी ३० लाख ३४ हजार १५८ रुपयांची बेहशिेबी मालमत्ता त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे रामदास बोडखे, त्यांचे बंधू आणि सहा मुले यांच्याविरुद्ध एसीबीने गुन्हे दाखल केले आहेत. मंगळवारी त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे एसीबीने जप्त केली आहेत. पुरुषोत्तम चौखंडे यांनी म्हटले की, बोडखे यांनी जनतेच्या पैशातून संपादित केलेली मालमत्ता पदाचा गैरवापर करून जमा केली आहे. त्यामुळे हा पैसा जनतेचा असून, शासनाने बेहशिेबी मालमत्ता जप्त करावी. तसेच गुन्हे दाखल झालेल्या सर्व आरोपींना अटक करावी. बोडखे यांनी मंत्रिपदावर असताना त्यांच्याविरोधात झालेल्या संबंधित तक्रारी दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेसच्या सरकारनेही त्यांना साथ दिल्याचा आरोप त्यांनी केला. एसीबीने चौकशीअंती बोडखे, त्यांची मुले व त्यांचे भाऊ यांनी ३० लाख ३४ हजार १५८ रुपये एवढी बेहशिेबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, ती संपत्ती त्या वेळेसच्या शासकीय दरामध्ये होती. आता ती २५ ते ३० कोटी रुपयांच्या वर आहे. त्यामुळे उर्वरित संपत्तीचीसुद्धा चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी चौखंडे यांनी केली आहे.

एसीबीने बाेडखेंच्या केलेल्या चाैकशीत बारगण पुर्‍यातील जुने घर, रामटेकपुरा येथील नवीन बांधकाम केलेले घर, अकोट बाजारपेठेतील अॅपोलो टायर नावाचे दुकान तसेच अडगाव बु. येथील ले आउटकरिता असलेली ७ एकर १० गुंठे शेती, अशी मालमत्ता दिसून आली आहे.
जामनिासाठी धडपड : बोडखे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांनी शुक्रवारी अकाेट न्यायालयात अटकपूर्व जामनिासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने २५ ऑगस्टला बोडखे, त्यांचे बंधू आणि सहा मुलांच्या जामीन अर्जांवर सुनावली ठेवली आहे.

एसीबीकडे सादर केले होते पुरावे
रामदास बोडखे अकोट मतदारसंघाचे आमदार होण्याअगोदर त्यांच्याकडे स्वत:ची मालमत्ता नव्हती. केवळ रामटेकपुरा येथे स्वत:चे जुने घर होते. वडिलोपािर्जत शेती अथवा इतर स्थावर चल-अचल संपत्ती नव्हती. आमदार झाल्यानंतर स्वत:च्या नावे, मुलांच्या व नातेवाइकांच्या नावे बोडखेंनी प्रचंड मालमत्ता विकत घेतली. त्यानंतर २००२ मध्ये रोजगार हमी योजनेचे मंत्री झाल्यानंतर त्यांनी पदाचा दुरुपयोग करीत पैसा लाटला. त्याचे सर्व पुरावे एसीबीकडे चौखंडे यांनी सादर केले होते.