आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामटेके हल्ला प्रकरण; सूत्रधार अटकेत , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राष्ट्रवादीकाँग्रेसचे नगरसेवक अजय रामटेके यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार संतोष सोनोने याला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई येथून बुधवारी अटक केली. याप्रकरणी चार आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष सोनोनेला गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजय रामटेके नगरसेवक फजलू पहिलवान हे ११ जुलै रोजी सकाळी मुंबई येथून अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचले. दरम्यान, दामले चौकाकडे जात असताना हल्लेखोरांनी रामटेके यांच्यावर पूर्ववैमनस्यातून हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या तसेच धारदार कोयत्याने हल्ला केला. यात रामटेके गंभीर जखमी झाले. यापूर्वी २८ मे २०१२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयानजीक रामटेके यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. यातील शेख मोहसीन शेख समद, सागर सरोदे, भद्या सोनू जाधव या चौघांना अटक केली होती. सध्या हे चारही आरोपी कारागृहात आहेत. हल्ल्यातील मुख्य सूत्रधार संतोष सोनाेने हा मुंबई येथील मरीन ड्राइव्ह परिसरातील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती अकोला स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरून पोलिसांनी बुधवार, २७ ऑगस्ट रोजी सापळा रचून सोनाेने याला त्याच्या साथीदारासोबत अटक केली.