आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रमजान विशेष: छोटेशे पारंपरिक कुराण बनले कौतुकाचा विषय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहराच्या महम्मद अली मार्गावरील निवासी विधिज्ञ महम्मद परवेज यांच्याकडे चांदीच्या डबीत छोटेसे कुराण आहे. हे परंपरेने चालत आलेले कुराण डोळ्यांनी वाचता येत असून, ते 50 ते 60 वर्षांपूर्वीचे असावे, असे ते सांगतात. त्यांच्याकडे अलिफी कुराण व फोटोच्या एका फ्रेममध्ये कुराणही पाहावयास मिळते.

अँड. परवेज यांना या कुराणाविषयी फारशी माहिती नसली तरी, त्यांच्या अम्मीला त्यांच्या मोठय़ा वडिलांकडून ते मिळाल्याचे ते सांगतात. हे छोटेशे कुराण छापील स्वरूपाचे असल्याने प्राचीन नसावे. मात्र, आपल्या पद्धतीचे ते अकोलेकरांसाठी एकमेव आहे. अनेक वर्षांपासून चांदीच्या डबीत त्यांनी आदराने ते जपून ठेवले आहे. डोळ्यांनी त्याचे वाचन करणे शक्य आहे. मात्र, फार वेळ वाचणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले. त्यांच्याकडे इंग्रजी, मराठी, उर्दू, अरबी भाषेतील कुराण उपलब्ध आहेत. या कुराणला सुवर्णकिनार असून, प्रत्येक भाग सहा पानांमध्ये सामावला आहे. त्याच्या पानांचा आकार 12 गुणा 15 1/2 (साडेपंधरा) इंच इतका आहे. त्याचे प्रिन्टिंग भारतातच झाले आहे.

कुराणचा इंग्रजी अनुवाद
महम्मद परवेज यांचे नातेवाईक आदम इसाभाई यांनी कुराणचा इंग्रजी अनुवाद केला असून, ए. एस. उखळकर यांनी त्याचे प्रकाशन केले आहे. अँड. परवेज म्हणाले की, अरबी भाषेतील पहिला शब्द अलिफनेच प्रत्येक ओळीची सुरुवात होणारे अलिफी कुराणही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या एका जवळच्या मित्राने सुवर्णकाम केलेले हे अलिफी कुराण भेट दिले आहे.

रूप अनेक पण संदेश एक
रमजानच्या पवित्र रात्रीत अवतरलेला धर्मग्रंथ कुराण मानवाला जगण्यासाठी मार्गदर्शक आहे. या कुराणची रूपे, माध्यम, आकार, रंग वेगळे असले तरी, संदेश एकच मानवता शिकवणारे असल्याचे अँड. परवेज यांनी सांगितले.