आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात चिमुकलीवर बलात्कार; क्रूरकर्मा गजाआड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - एका क्रूरकर्मा युवकाने चिमुकल्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना 24 सप्टेंबरला सकाळी जुने शहरातील शिवसेना वसाहतमध्ये घडली. महिला अत्याचार रोखण्यासाठी सक्षम कायदा केल्यानंतरही बलात्काराच्या घटना थांबत नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी प्रदीप उर्फ सुरेश दांडगे (18) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तपास ठाणेदार नंदकिशोर शर्मा, करनकार करत आहेत.

अत्याचार आला उजेडात
बलात्कारानंतर चिमुकलीने नराधमाच्या तावडीतून कशी तरी स्वत:ची सुटका करून घेतली. ती रडतच घराबाहेर आली. या वेळी परिसरातच राहणारी तिची मावशी तिला भेटली. मावशीला मुलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसले. मुलीला जवळ घेऊन मावशीने तिची विचारपूस केली. त्यानंतर चिमुकलीवर बलात्कार झाल्याचा घृणास्पद प्रकार उजेडात आला.

नराधमाने दिली धमकी
बलात्कारामुळे रक्तस्राव झाल्याने चिमुकली रडू लागली. त्यामुळे नराधमाने मुलीला ‘रडल्यास तुझ्या आईला सांगेल’, अशी धमकी दिल्याचे सांगण्यात आले.

नजर कुकर्मावर
आरोपी प्रदीप दांडगे हा या पीडित चिमुकलीच्या शेजारी राहतो. तो इमारतीमध्ये टाइल्स लावण्याचे काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिमुकली घराबाहेर खेळत होती. प्रदीपने तिला किराणा दुकानावरून काथाची पुडी आणण्यासाठी पाच रुपये दिले. पुडी खरेदीनंतर उरलेले तीन रुपये घेऊन घे, असेही तो तिला म्हणाला. पुडी आणल्यानंतर प्रदीपने चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.