आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला घरात कोंडून पत्नीवर अत्याचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - पतीला खोलीत कोंडून दोघांनी त्याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना हतेडी बुद्रूक येथे १० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आज, १३ सप्टेंबर रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक चिखली रोडवरील हाजी मलंगबाबा दर्ग्याजवळ राहणाऱ्या दाम्प्त्यांना अरुण हिंमतराव निकाळजे याने हतेडी बुद्रूक येथे प्लॉटची वाटणी व सखूबाई निकाळजे हिच्या पैशाची वाटणी करावयाची असल्याने १० सप्टेंबर रोजी हतेडी येथे बोलावले. वाटे हिशावरून पीडित महिलेचा पती व तिच्यासोबत वाद घालून तिच्या पतीला एका खोलीत कोंडण्यात आले.
पीडित महिलेस एका खोलीत उचलून नेले. यावेळी अरुण निकाळजे व दीपक निकाळजे यांनी तिच्या अत्याचार केला. तर सखूबाई निकाळजे, संजय निकाळजे, आरती निकाळजे व मंगला रंगनाथ बिबे यांनी त्यांना सहकार्य केले अशी तक्रार पीडित महिलेने ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.