आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raped; Accused Son In Law In Jail Issue At Akola

मुलीवर बलात्कार; आरोपी जावई गजाआड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - दर्यापूर तालुक्यातील नांदरून येथील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या वासनांध जावयाला येवदा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध सोमवारी रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. नंतर ते प्रकरण येवदा पोलिसांकडे हस्तांतरित केले होते.

नांदरून येथील १४ वर्षीय मुलीवर तिचा सावत्र जावई मंगेश गंुबळे याने वारंवार अत्याचार केला होता कुणाला सांगितल्यास तिच्‍यासह आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान, मुलगी गर्भवती राहिली. या मुलीवर दर्यापूर येथील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर तिच्‍यावर येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार करण्यात आले. डिसेंबर रोजी या मुलीने एका मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर रुग्णालयाने रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी सोमवारी रात्री सावत्र जावई मंगेश गुंबळे याच्याविरुद्ध बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद केली होती. घटनास्थळ येवदा पोलिस ठाण्यांतर्गत येत असल्यामुळे रामदासपेठ पोलिस हे प्रकरण घेऊन येवदा येथे गेले. येवदा पोलिसांनी मंगळवारी आरोपी मंगेश गुंबळे याला अटक केली.

संरक्षण नाकारले
^आम्हीमंगळवारी अकोल्यात आलो. मुलीचे आणि तिच्या आईचे बयाण घेतले. आम्ही मुलीला संरक्षण देणार होतो. मात्र, मुलीच्या आईने ते नाकारले. आरोपी मंगेश गुंबळे याला आम्ही अमरावती येथील अंबाविहार येथून ताब्यात घेतले आहे. विश्वनाथमुळे, प्रभारीठाणेदार, येवदा

मुलीची चौकशी
आरोपीलाअटक केल्यानंतर येवदा पोलिस अकोल्यात आले होते. त्यांनी मुलीची चौकशी केली. त्यानंतर मुलीच्या आईवडिलांचीही त्यांनी भेट घेतली. या वेळी रुग्णालय प्रशासनाला त्यांनी मुलीची विशेष दक्षता घेण्याचे सांगितले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या मुलीची जागा हलवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.