आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rathi Shop Was Sealed Issue At Akola, News In Marathi

राठी पेढेवाल्याचे दुकान केले सील, एक लाख रुपयांचा दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनपाच्या स्वच्छता विभागाने शुक्रवार, 25 जुलै रोजी रतनलाल प्लॉटमधील राठी पेढेवाला या विक्रेत्याकडून अस्वच्छता आढळल्याने एक लाख रुपयांचा दंड वसूल केला. तसेच त्यांचे दुकानही सील करण्यात आले.

मागील काही दिवसांपासून आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर व उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी ‘क्लीन अकोला-ग्रीन अकोला’ मोहीम सुरू केली आहे. याचा एक भाग म्हणून उघड्यावर अन्न विक्री करणारे चिल्लर व किरकोळ विक्रेते, हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विकणार्‍या विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत शहरातील दीडशेहून अधिक लहान मोठय़ा विक्रेत्यावर कायद्याचे उल्लंघनप्रकरणी कारवाया करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रतनलाल प्लॉट चौकातील राठी पेढेवाला या विक्रेत्याकडे अस्वच्छता आढळून आली. याप्रकरणी राठी पेढेवाल्याकडून एक लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई स्वच्छता अधिकारी सुरेश पुंड व पथकाने केली.

मधू हॉटेलवरही कारवाई
आज सकाळी सिव्हिल लाइन भागातील मधू हॉटेलचे अतिक्रमण काढल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. या ठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांनी सर्व काही नियमात असतानाही चुकीची कारवाई केल्याचा आरोप व्यावसायिक मधुकरराव रायपुरे यांनी केला आहे.