आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात होणार रावणाचे दहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शहरात विजयादशमीनिमित्त रविवारी, 13 ऑक्टोबरला भारत विद्यालयाच्या मैदानात आणि संत तुकाराम चौकात रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. रावणाच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, रविवारी दुपारपर्यंत पुतळा उभारण्यात येणार आहे.

संत तुकाराम चौकात जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सायंकाळी सात वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते 51 फूट रावणाचे दहन करण्यात येणार आहे. हा पुतळा गाजरगवत व प्लास्टिकच्या पिशव्यांपासून बनवलेला आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर हानिकारक असून, त्याचा वापर टाळावा, हा संदेश यातून दिला जाणार आहे. महागाई, रोगराई, भ्रष्टाचार या गोष्टी नष्ट व्हाव्यात, याचे रावण दहन हे प्रतीक आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष र्शीकांत पिसे, अप्पर पोलिस अधीक्षक निकेत खाटमोडे, शहर उपअधीक्षक अमरसिंग जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, राष्ट्रवादीचे नेते संदीप पाटील, शामराव अवस्थी, बंडूभाऊ बलोदे, स्वप्निल देशमुख, अमोल क्षीरसागर, अमोल कदम, जय पाटील, गौरव गावंडे, सुशील शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. 51 फूट पुतळा बनवण्यासाठी दहा कारागिरांना सहा दिवस लागले. पुतळ्यासाठी 200 मीटर्स कापड लागला.

भारत विद्यालयाच्या मैदानावर भाजपतर्फे सायंकाळी 7 वाजता रावण पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. या वेळी खासदार संजय धोत्रे, आमदार डॉ. रणजित पाटील, भाजप शहराध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे, नगरसेवक विजय अग्रवाल, शिवसेना जिल्हा प्रमुख र्शीरंग पिंजरकर, सहकार नेते वसंतराव धोत्रे उपस्थित राहणार आहे. हा पुतळा मुकुटासह 41 फूट उंच असून, 12 फूट रुंद आहे. पुतळा तयार करण्यासाठी पाच कारागिरांना चार दिवस लागले, तर 80 मीटर्स कापड आणि मुकुट व दागिन्यांसाठी हिटलॉनचा वापर करण्यात आला.

कारागीर म्हणतात...
व्यवसायाला आठ वर्षे
हा पारंपरिक व्यवसाय असून, मागील आठ वर्षांपासून या व्यवसायात आहे. इतर वेळी टोपल्या, सूप, दवळी, ताटी बनवण्याचे काम करतो.’’ देवा ठाकरे, कारागीर

बालपणीच प्रशिक्षण
हा परंपरागत व्यवसाय असल्यामुळे बालपणापासूच काम पाहत आलो. प्रशिक्षणही तेव्हाच मिळाले. दहावीपर्यंत शिक्षणानंतर प्रत्यक्ष काम सुरु केले.’’ सुनील अंजनकर, कारागीर.

तीन वर्षांपासून निर्मिती
मंडप डेकोरेशनचे काम करताना मागील तीन वर्षांपासून रावणाचे पुतळे बनवण्यास सुरुवात केली. याचे प्रशिक्षण रत्नाकर आप्पा ओव्हळे यांच्याकडून घेतले.’’ गोपाल डेहणकर, कारागीर.