आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये विक्रमी मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोला लोकसभा मतदारसंघात मतदारांनी विक्रमी मतदान केले. लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी लोकांनी पुढाकार घेत मतदानाची टक्केवारी वाढवली. या मतदारसंघात 58.53 टक्के मतदान झाले. गुरुवार, 10 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार, 9 लाख 77 हजार 405 लोकांनी त्यांचे मत नोंदवले. यामध्ये 61.79 टक्के पुरुष (5,43,856), तर 54.91 टक्के (4,33,549) महिलांनी मतदान केले आहे. सर्वाधिक मतदान हे अकोला पूर्व मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात झाले आहे. लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीच्या तुलनेत दोन लाख 38 हजार 150 मतदारांचे अधिकचे मतदान यंदा झाले आहे.

अकोट विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसभा निवडणुकीसाठी अकोट विधानसभा मतदारसंघात यंदा टक्केवारीच्या दृष्टीने सर्वात जास्त मतदान झाले. येथे 93 हजार 705 पुरुष, तर 70 हजार 387 महिलांनी मतदान केले, असे एकूण 1 लाख 64 हजार मतदारांनी मते दिलीत. गेल्या निवडणुकीत येथे 1 लाख 19 हजार 369 मतदारांनी मते दिली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथे 44,723 मते अधिक पडलीत.

बाळापूर विधानसभा मतदारसंघ
येथे 1,66,259 लोकांनी मते टाकली. 61.07 टक्के मते येथे पडली. येथे 93 हजार 135 पुरुष, तर 73 हजार 124 महिलांनी मतदान केले. गेल्या निवडणुकीत येथे 1 लाख 24 हजार 4 मते पडली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथे 42,255 मते अधिक पडली आहेत.

अकोला प. विधानसभा मतदारसंघ
अकोला लोकसभा निवडणुकीसाठी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात आकडेवारीच्या दृष्टीने यंदा सर्वात कमी मतदान झाले. येथे 82 हजार 778 पुरुष, तर 67 हजार 765 महिलांनी मतदान केले, असे एकूण 1 लाख 50 हजार मतदारांनी मते दिलीत. गेल्या निवडणुकीत येथे 1 लाख 07 हजार 666 मतदारांनी मते दिली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथे 42,877 मते अधिक पडलीत. उर्वरित. पान 4

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदा आकडेवारी दृष्टीने सर्वात जास्त मतदान झाले. येथे 93 हजार 633 पुरुष, तर 74 हजार 872 महिलांनी मतदान केले, असे एकूण 1 लाख 68 हजार 505 मतदारांनी मते दिलीत. गेल्या निवडणुकीत येथे 1 लाख 30 हजार 144 मतदारांनी मते दिली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथे 38,361 मते अधिक पडलीत.

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ
येथे 1,61,487 लोकांनी मते टाकली. 56.37 टक्के मते येथे पडली. येथे 89 हजार 839 पुरुष, तर 71 हजार 648 महिलांनी मतदान केले. गेल्या निवडणुकीत येथे 1 लाख 28 हजार 625 मते पडली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथे 32, 862 मते अधिक पडली आहेत.

रिसोड विधानसभा मतदारसंघ
महिलांचे सर्वाधिक मतदान हे रिसोड विधानसभा मतदारसंघात झाले. येथे महिलांनी 75 हजार 753 मत दिलीत. येथे 90 हजार 766 पुरुषांनी मत दिलीत. असे एकूण 1 लाख 66 हजार 519 मतदारांनी मत दिलीत. गेल्या निवडणुकीत येथे 1 लाख 27 हजार 805 मतदारांनी मते दिली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथे 38,714 मते अधिक पडलीत.

राजकीय पंडितांची गणिते अवघड
लोकसभा मतदारसंघात नेमके कोण विजयी होईल, असे ठाम मत कोणीच सांगू शकत नसल्याचे चित्र आहे. लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे, भारिप-बमसंचे अँड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे हिदायत पटेल यांच्यात ही लढत आहे. त्यामुळे आता नेमके कोण विजयी होईल, याचा अंदाज बांधणे राजकीय पंडितांसाठी अवघड झाले आहे. इतर उमेदवारांनी कुणाची मते खाल्ली, याचादेखील परिणाम लोकसभेच्या विजयी उमेदवारावर होणार असून, रिसोड विधानसभा मतदारसंघात झालेले मतदानदेखील प्रभाव टाकणारे राहील. काँग्रेसला राष्ट्रवादीचा तर भाजपला शिवसेनेचा किती फायदा झाला, याचेदेखील गणित मांडले जात आहे. विविध राजकीय घडामोडी आणि इतर गोळाबेरजेच्या राजकारणात नेमके कुणाचा विजय निश्चित होतो, याची सामान्य मतदारांमध्ये चर्चा आहे. जातीय समीकरण हेदेखील मुख्य कारण असून, या निवडणुकीत कुठल्या समाजाने कुठे मते टाकली, याची निश्चित माहिती मतदारांनाच असल्याने अनेक गुपिते हे मतमोजणीच्या दिवशी अर्थात ‘16 मे’ रोजीच जाहीर होतील. मतदार राजाने कुणाला कौल दिला, याची माहिती मतमोजणीच्या दिवशी
अधिक स्पष्ट होईल.

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ : अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदा आकडेवारी दृष्टीने सर्वात जास्त मतदान झाले. येथे 93 हजार 633 पुरुष, तर 74 हजार 872 महिलांनी मतदान केले, असे एकूण 1 लाख 68 हजार 505 मतदारांनी मते दिलीत. गेल्या निवडणुकीत येथे 1 लाख 30 हजार 144 मतदारांनी मते दिली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथे 38,361 मते अधिक पडलीत.

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ : येथे 1,61,487 लोकांनी मते टाकली. 56.37 टक्के मते येथे पडली. येथे 89 हजार 839 पुरुष, तर 71 हजार 648 महिलांनी मतदान केले. गेल्या निवडणुकीत येथे 1 लाख 28 हजार 625 मते पडली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथे 32, 862 मते अधिक पडली आहेत.

रिसोड विधानसभा मतदारसंघ : महिलांचे सर्वाधिक मतदान हे रिसोड विधानसभा मतदारसंघात झाले. येथे महिलांनी 75 हजार 753 मत दिलीत. येथे 90 हजार 766 पुरुषांनी मत दिलीत. असे एकूण 1 लाख 66 हजार 519 मतदारांनी मत दिलीत. गेल्या निवडणुकीत येथे 1 लाख 27 हजार 805 मतदारांनी मते दिली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत येथे 38,714 मते अधिक पडलीत.

राजकीय पंडितांची गणिते अवघड : लोकसभा मतदारसंघात नेमके कोण विजयी होईल, असे ठाम मत कोणीच सांगू शकत नसल्याचे चित्र आहे. लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे, भारिप-बमसंचे अँड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे हिदायत पटेल यांच्यात ही लढत आहे. त्यामुळे आता नेमके कोण विजयी होईल, याचा अंदाज बांधणे राजकीय पंडितांसाठी अवघड झाले आहे. इतर उमेदवारांनी कुणाची मते खाल्ली, याचादेखील परिणाम लोकसभेच्या विजयी उमेदवारावर होणार असून, रिसोड विधानसभा मतदारसंघात झालेले मतदानदेखील प्रभाव टाकणारे राहील. काँग्रेसला राष्ट्रवादीचा तर भाजपला शिवसेनेचा किती फायदा झाला, याचेदेखील गणित मांडले जात आहे.

विविध राजकीय घडामोडी आणि इतर गोळाबेरजेच्या राजकारणात नेमके कुणाचा विजय निश्चित होतो, याची सामान्य मतदारांमध्ये चर्चा आहे. जातीय समीकरण हेदेखील मुख्य कारण असून, या निवडणुकीत कुठल्या समाजाने कुठे मते टाकली, याची निश्चित माहिती मतदारांनाच असल्याने अनेक गुपिते हे मतमोजणीच्या दिवशी अर्थात ‘16 मे’ रोजीच जाहीर होतील. मतदार राजाने कुणाला कौल दिला, याची माहिती मतमोजणीच्या दिवशी अधिक स्पष्ट होईल.