आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेबांच्या स्वागतासाठी प्लॅटफॉर्मवर रेड कार्पेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कधीनव्हे ते चकाचक रेल्वेस्थानक, जागाेजागी तगडा पाेलिस बंदाेबस्त, कार्यमग्न कर्मचारी अाणि साहेबांच्या स्वागतासाठी अंथरलेले रेड कार्पेट हे रेल्वेस्थानकावरील चित्र अकाेलेकरांच्या डाेळ्याचे पारणे फेडणारे ठरले. निमित्त हाेते मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांच्या अकाेला रेल्वेस्थानक भेटीचे. एरवी प्रचंड अस्वच्छ असणारे रेल्वेस्थानक अाज साहेबांच्या अागमनाने रांगाेळ्यांनी सजले हाेते. रेल्वे प्रशासनाचा हा जबरदस्त देखावा पाहून प्रवाशांनी ‘साहेब, तुम्ही दरराेजच या’ अशी भावनाही अाज व्यक्त केली.
सुनीलकुमार सूद यांनी गुरुवारी बडनेरा ते भुसावळ रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वेस्थानकांची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी अकोला रेल्वेस्थानकावरील दीड वर्षापासून रेंगाळलेला पार्किंगचा प्रश्न लवकर सोडवण्याचा पार्ट टाइम पार्किंग सुरू करण्याच्या सूचना दिल्या तसेच साप्ताहिक गाड्या नियमित करण्याबाबत आश्वासन दिले. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता त्यांनी बडनेरा रेल्वेस्थानकापासून तपासणी सुरू केली. दुपारी वाजून २० मिनिटांनी त्यांची १५ डब्यांची स्पेशल तपासणी ट्रेन अकोला रेल्वेस्थानकावर दाखल झाली. या वेळी त्यांच्यासोबत डीआरएम महेश कुमार गुप्ता आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा होता. सुरुवातीला त्यांनी राष्ट्रभाषा हिंदी पुस्तकालयाचे उद््घाटन केले. त्यानंतर त्यांनी भारत पेट्रोलियमने सुरू केलेल्या स्मार्ट कार्डचे उद््घाटन केले. पाच मिनिटे त्यांनी प्रलंबित मागण्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर त्यांनी आरक्षित तिकीटगृहाच्या इमारतीचे उद््घाटन करून रेल्वेच्या डॉग स्कॉडला भेट दिली. या वेळी त्यांनी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला. अकोटफैलकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाच्या अवस्थेबाबत यात्री संघाने त्यांना अवगत केले आणि नवीन पूल बांधण्याची मागणी केली. रेल्वेच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. डीअारएम महेश कुमार गुप्ता अाणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा त्यांच्यासोबत होता. या वेळी खासदार संजय धोत्रे, व्यवस्थापक बी. पी. गुजर, रेल्वे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक राजेश बढे, रेल्वे पोलिस निरीक्षक डी. बी. सरप यांची उपस्थिती होती.
जीएमच्या गाडीमुळे प्रवाशांना त्रास
जीएमयांची स्पेशल ट्रेन फलाट क्रमांक वर थांबली होती. यादरम्यान भुसावळकडे जाण्यासाठी फलाट क्रमांक वर थांबलेल्या प्रवाशांना गाडी फलाट क्रमांक वर आल्यानंतर येणार असल्याच्या सूचना देण्यात आल्याने प्रवाशांची धावपळ झाली. त्यामुळे महिला लहान मुलांना त्याचा त्रास सहन करावा लागला.
स्टिंग ऑपरेशन करा आणि मला पाठवा
माध्यमांनारेल्वेस्थानकावर बंदी नाही. जर काही आक्षेपार्ह घटना घडत असतील तर त्याचे तुम्ही स्टिंग ऑपरेशन करा. तुम्हाला कुणीही अडवणार नाही. तुम्ही स्टिंग करणार नाही, तर आम्हाला कळणार कसे. असे म्हणून महाप्रबंधक सुनीलकुमार सूद यांनी रेल्वेचे पारदर्शकतेबाबत उपस्थितांना आश्वासित केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
पार्ट टाइम पार्किंग देणार
रेल्वेस्थानकावरपार्किंगचा प्रश्न दीड वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे वाहने चोरीच्या घटना नियमित घडतात. एका वर्षामध्ये २५ दुचाकींची चोरी झाली. त्याबाबत महाव्यवस्थापक यांना विचारले असता रेल्वेस्थानकावर पार्ट टाइम दुचाकी कार पार्किंग तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी डीआरएम यांना केल्या. पार्किंगची कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत पार्ट-टाइम व्यवस्था करण्यात येणार असून, प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.