अकोला- ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा’ संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे समाजसेवेचा वसा जपणारी रेडक्रॉस सोसायटी यंदा 151 व्या वर्षात पदार्पण करत आहे. सर हेनरी डुनांट यांनी संस्थेचे बीजारोपण केले अन् 8 मे हा रेडक्रॉस दिन म्हणून आज जगभरात पाळला जातो. अकोला रेडक्रॉसलाही 80 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असून, वर्षभर संस्थेमार्फत अनेकविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.
हेनरी डुनांट व्यवसायाच्या निमित्ताने इटलीमधून प्रवास करत असताना सालफर्निओ येथे फ्रान्स व ऑस्ट्रियाच्या युद्धात हजारो सैनिक मृत्युमुखी पडले. यासोबतच जखमी झालेले व औषधपाण्यापासून वंचित असलेले सैनिक त्यांना दिसले. त्यांनी आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांच्या मदतीने त्यांची सेवा केली. यातूनच रेडक्रॉस सोसायटीचे बीजारोपण झाले. त्यांनी युरोप खंडाचा दौरा केला. राजे, महाराज, सरदार यांची भेट घेतली व त्यांच्या प्रयत्नांना यश आले. 1883 च्या फेब्रुवारीत जिनिव्हा येथे पाच सदस्यांची एक समिती स्थापन झाली. त्याचे सचिव सर हेनरी डुनांट होते. कालांतराने हीच आंतरराष्ट्रीय समिती व रेडक्रॉस समिती म्हणून नावारूपास आली. 1963 मध्ये रेडक्रॉसने शताब्दी साजरी केली. रेडक्रॉस संघाची स्थापना 1919 मध्ये पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर झाली. फ्रान्स, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका ही पाच राष्ट्रे सुरुवातीला या संघाचे सभासद होते. या संघाचे मुख्यालय आय. सी. आर. सी. च्या कार्यालयाप्रमाणेच जिनिव्हा येथे आहे. भारतात रेडक्रॉस सोसायटीची स्थापना त्या वेळच्या कायदे मंडळाने 1920 मध्ये केलेल्या कायद्यानुसार झाली. या संस्थेचे मुख्या