आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुडपी जंगलाचे निर्वनीकरण कासवगतीने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विदर्भातील झुडपी जंगलापैकी वन व्यवस्थापनाच्या दृष्टीने अयोग्य असलेली तुकड्या-तुकड्यातील ३२, २२९.८१ हेक्टर, अतिक्रमणाखालील २७,५०७,.३४ हेक्टर वनेतर वापराखाली असलेली २६६७२.१७ अशी एकूण ८६,४०९.३२ हेक्टर जमिनीच्या निर्वनीकरणाला केंद्र सरकारने मार्च २०१४ रोजी मान्यता दिली. त्याला येत्या मार्चमध्ये वर्ष होईल. मात्र, अजूनही निर्वनीकरण होऊ शकल्याने मुख्यमंत्री कार्यालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालय तसेच प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या संयुक्त वतीने निर्वनीकरणाबाबत १९ नोव्हेंबर २०१४ रोजी एक कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत निर्वनीकरणासाठी उपयोगात आणायची सुलभ कार्यपद्धती सांगण्यात आली. वन व्यवस्थापनाच्या दृष्टीने अयोग्य असलेल्या हेक्टर खालील तुकड्या-तुकड्यातील झुडपी जंगल क्षेत्राचे तातडीने निर्वनीकरण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला.
विभागातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना तालुकानिहाय वर्गवारीमध्ये निर्वनीकरणाचे कमीतकमी २०० हेक्टरचे प्रस्ताव तयार करून पाठवण्यास सांगण्यात आले. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल २१ डिसेंबर २०१४ पूर्वी पाठवावे, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून अजूनही कार्यवाहीच सुरू असल्याचे कळवण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जानेवारी २०१५ रोजी पुन्हा एकदा स्मरणपत्र देण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाकडून झुडपी जंगलाच्या निर्वनीकरणासंबंधात वारंवार विचारणा करण्यात येत असल्याने या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे आणि १५ जानेवारीपर्यंत निर्वनीकरणाचे काम पूर्ण करावे, अशा सूचना होत्या. त्यानंतरही काम पूर्ण झाले नसल्याचे समजते.