आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ‘गण गण गणांत बोते’चा गजर , ऋषीपंचमीनिमित्त धार्मिक उत्सव, महाप्रसादाचे अायाेजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातीलसर्व गजानन मंदिरात आज, ३० आॅगस्ट रोजी गण गण गणांत बोतेंचा गजर दुमदुमला. ऋषीपंचमीचे अौचित्य साधून शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेगावीचे संत श्री गजानन महाराज समाधी दिनाच्या महोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख गजानन मंदीरापैकी एक असलेल्या मुकुंदनगरातील गजानन मंदिरात ऋषीपंचमी उत्सव उत्साहात पार पडला.

यामध्ये २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान, विविध कार्यक्रम झाले. यामध्ये २७ ते २९ ऑगस्टदरम्यान दररोज सकाळी दहा ते १२ यावेळेत श्री गजानन विजयग्रंथाचे पारायण करण्यात आले. व्यासपीठाचे नेतृत्व रमेश महाराज रोठे यांनी केले, तर २९ ऑगस्टला सायंकाळी वाजता तीर्थाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर रात्री ८.३० ते १०.३० दरम्यान दिलीप महाराज पान्हेरा यांचे हरिकीर्तन झाले. त्यांनी कीर्तनातून उपस्थितांना विविध विषयांवर प्रबोधन केले.

आज, ३० ऑगस्टला ऋषीपंचमीचे औचित्य साधून दिवसभर विविध धािर्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंदिरामध्ये दर्शनासाठी भािवकांची दिवसभर गर्दी होती.
मंदिरात सकाळी ला लघुरुद्र अभिषेक श्रींची महापूजा करण्यात आली. त्यानंतर १० ते १२ यावेळेत दिलीप महाराज पान्हेरा यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी ते दरम्यान महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शेगावच्या धर्तीवर रांग लावून पोळी-भाजीचा प्रसाद भािवकांना वितरित करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी श्रींची नगर प्रदक्षिणा निघाली. यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नगर प्रदक्षिणेला सायंकाळी ५.३० ला मुकुंदनगरातील मंदिरातून प्रारंभ झाला. पालखीत श्रींचा चांदीचा मुखवटा मागे भािवक मोठ्या संख्येने चालत जात होते. तेथून पालखी गोकुळ कॉलनी, जवाहरनगर, सुधीर कॉलनी, राम मंदिर, संताजीनगर, रविनगरमार्गे निघून मंदिरात परतली.

सर्वच गजानन मंदिरात गर्दी
ऋषीपंचमीच्यापर्वावर दर्शनासाठी शहरातील सर्वच गजानन मंदिरात भािवकांची गर्दी होती. यामध्ये मुख्यत्वे जुने शहरातील गजानन मंदिर, गोडबोले प्लॉट मंदिर, कौलखेडचे मंदिर, जठारपेठमधील गजानन मंदिरांमध्ये भािवकांची विशेष गर्दी दिसून आली. तसेच या मंदिरांमध्येही ऋषीपंचमीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.