आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला पूर्व मतदारसंघातील बीएलओंना मिळाले प्रशिक्षण, व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे मार्गदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघांतर्गत येणा-या मतदान केंद्राधिकारी, झोनल अधिकारी यांना ईव्हीएम मशीनबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मतदान प्रक्रियेबाबत व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे माहिती दिली.
प्रमिलाताई ओक हॉलमध्ये झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत मतदान केंद्रे, ईव्हीएम मशीन, कर्मचा-यांच्या याद्या आदींबाबत नियोजन करण्यात आले. हे दुसरे प्रशिक्षण सत्र होते. प्रशिक्षणामध्ये निवडणुकीचे काम जबाबदारीपूर्वक नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी मतदान साहित्य घेण्यापासून तर मतदान केंद्रावरील व्यवस्थापन, प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया आणि मतदान संपल्यानंतरचे विविध अहवालासह साहित्य गोळा करण्याबाबतच्या पूर्ण प्रक्रियेचे इत्थंभूत मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. तसेच निवडणूक आयोगाने तयार केलेली ईव्हीएम माहितीबाबतच्या व्हिडिओ सीडीसुद्धा दाखवण्यात आली. मतदान प्रक्रिया बिनचूकपणे पूर्ण करण्याचे आदेशित केले. या वेळी निवडणूक निरीक्षक आर. सेल्वम यांनी मतदान पथकांना संबोधित करून मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्याबाबत निर्देश दिले. या प्रशिक्षणाला तहसीलदार संतोष शिंदे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, पूजा माटोडे, प्रतीक्षा तेजनकर, आराधना निकम आदी अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणाला मतदान केंद्राध्यक्ष ३४०, मतदान अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
क्षेत्रीयअधिका-यांनी दिले प्रशिक्षण
अकोलापूर्व विधानसभा मतदारसंघातील ३० क्षेत्रीय अधिकारी यांनी ईव्हीएमचे प्रशिक्षण सर्व मतदान पथकांना दिले. प्रशिक्षणासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिंदे, राजेंद्रसिंग जाधव यांनी ईव्हीएमबाबत मतदान पथकांना प्रात्यक्षिक दाखवले.