आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reliance Case To Making Right Decisions: Commissioner, Latest News, Divay Marathi,

रिलायन्स प्रकरणात योग्य निर्णय घेऊ :आयुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-थांबा आणि वाट पाहा, असा संदेश देत आयुक्तांनी काँग्रेस व इतर नगरसेवकांना रिलायन्स प्रकरणात योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. बुधवार, 5 मार्चला विरोधी पक्षनेते हरीश आलिमचंदानी यांनीदेखील आयुक्तांची भेट घेत रिलायन्सप्रकरणी प्रशासकीय भूमिकेबाबत माहिती घेतली. त्यांनाही आयुक्तांनी संकेतात्मक संदेश देत सविस्तर चर्चा करणे टाळले.
मनपाच्या 26 फेब्रुवारीला झालेल्या महासभेत रिलायन्स खोदकाम व इतर पाच विषय मंजूर झाल्याचा प्रस्ताव महापौर ज्योत्स्ना गवई यांनी पाठवला आहे. या प्रस्तावावर नगरसचिवांची सही आहे की नाही, याची माहिती मनपा प्रशासन देत नसल्याचा आरोप काही नगरसेवकांनी आज केला आहे. मनपा प्रशासनाची महासभेविषयी कोणती भूमिका आहे, याची माहिती हरीश आलिमचंदानी यांनी आज आयुक्तांना विचारली. आयुक्तांनी त्यांनादेखील वाट पाहण्याचे संकेत देत बोळवण केली. याविषयी रिलायन्स प्रस्ताव विरोधी आणि सर्मथनात महापौरांचा प्रस्ताव प्राप्त झाल्याचे त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना सांगितले. दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष मदन भरगड यांनी काँग्रेस व इतर नगरसेवकांसह आयुक्तांना याविषयी विचारणा केली. त्यांनादेखील आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी हाच संदेश दिला. मदन भरगड यांच्यासोबत नगरसेवक काजी नाझिमोद्दीन, अजय रामटेके, आनंद बलोदे, मोहम्मद फजलू, शेख गंगा बेनीवाले यांच्यासह अलियार खान, मेहबूब खान, फरिद पहिलवान, अपक्ष अनहलक कुरेशी उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे.