आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स प्रकरणी चौकशीचे दिले आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरात फोर-जी केबल टाकणाऱ्या रिलायन्स कंपनीने मंजूर रस्त्यांव्यतिरिक्त केलेल्या खोदकामाची मोजणी होणार आहे. या प्रकरणास दैनिक ‘दवि्य मराठी’ने वाचा फोडली होती. शहरात पूर्वमान्यता न घेतलेल्या रस्त्यांवर केलेले खोदकाम मोजण्याचे आदेश महापालिका शहर अभियंता अजय गुजर यांनी दिले आहेत.
हे मोजमाप करताना रिलायन्सने व महापालिकेच्या संबंधित अभियंत्यांनी स्वतंत्रपणे खोदलेल्या रस्त्यांचे मोजमाप करून द्यावे, या दोन्ही अहवालाचा अभ्यास केल्यानंतर रिलायन्सने अतरििक्त खोदकाम आढळल्यास त्यांच्याकडून वसुली करण्यात येईल. रिलायन्स कंपनीने शहरात फोर-जी नेटवर्कसाठी आवश्यक भूमिगत केबल टाकली आहे. ही केबल टाकताना त्यांनी नागरी सुविधांवर परिणाम करेल असे काही ठिकाणी खोदकाम केले. हे खोदकाम करताना त्यांना नरि्धारित करून दिलेल्या रस्त्यांच्या व्यतरििक्त मोठ्या प्रमाणात खोदकाम केले. हे खोदकाम करताना त्यांनी महापालिकेच्या संबंधित क्षेत्रनहिाय अभियंत्यांची पूर्वपरवानगी घेतली नाही. त्यामुळे केबलचे अतिक्रमण त्यांनी शहरभर केल्याचे चित्र आहे. या विषयाला दैनिक दवि्य मराठीने वाचा फोडल्यानंतर महापालिका प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत रिलायन्सने केलेल्या खोदकामाचा अहवाल मागितला आहे. तसेच असा अहवाल महापालिका संबंधित क्षेत्रनहिाय अभियंत्यांकडून मागितला आहे. त्यामुळे हे दोन्ही अहवाल जुळणे आता आवश्यक झाले असून, यात तफावत आढळल्यास रिलायन्सवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. स्थानिक ठेकेदाराची आरडाओरड पाहता रिलायन्स या कंपनीने येथे खोदकाम करण्यासाठी स्थानिक कंत्राटदारांना सब कॉन्ट्रॅक्टर दिला आहे. या सब कॉन्ट्रॅक्टरचे गुंतवणूकदार व त्यांची नावे समोर आल्यास नवा गौप्यस्फोट होऊ शकतो, अशी माहितीमिळाली आहे.