आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reliance Proposal, Latest News In Divya Marathi,

रिलायन्सच्या प्रस्तावाला सर्वांचाच विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-महापालिकेत 26 फेब्रुवारी रोजी झालेली महासभा नियमबाहय़ असून, रिलायन्सचा झालेला ठराव रद्द करावा, अशी मागणी भारिप-बमसं वगळता इतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे. या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये राज्यातील चार मोठय़ा राजकीय पक्षांचे महानगराध्यक्ष सहभागी असल्याने या धरणे आंदोलनास महत्त्व प्राप्त झाले होते. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत निवेदन घेतले तसेच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या आंदोलनात आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार बबनराव चौधरी यांचा सहभाग होता.
दोन मिनिटात 22 ठराव
महापालिकेत गेल्या दोन वर्षांत महासभा मनमानी पद्धतीने घेण्यात येत आहे. दोन मिनिटात 22 ठराव घेण्याचा प्रताप या सत्तेने केला. महापौर एकही विषय चर्चेत येऊ देत नाही. मनपा आयुक्तांनी 26 फेब्रुवारी रोजी कुठलेही कामकाज झाले नाही, असे जाहीर केले आहे. रिलायन्स कंपनीचा हा प्रस्ताव फारच कमी किमतीचा आहे. या धोरणात्मक विषयावर चर्चा होणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव कायदेशीर मांडावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.