आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्सचे दोन टॉवर केले सील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मनपाचीपरवानगी घेता उभारलेल्या रिलायन्स जीओ इंफोकॉमच्या दोन टॉवरवर सीलची कारवाई करण्यात आली. नगरसेविका अॅड. धनश्री अभ्यंकर-देव यांनी महापालिकेची परवानगी घेता प्रसाद कॉलनी, जठारपेठ भागात रिलायन्स जीओ इंफोकॉमचे टॉवर उभारले जात असल्याची तक्रार महापौर उज्ज्वला देशमुख यांच्याकडे केली होती. याची दखल घेत प्रशासनाने टॉवरवर सीलची कारवाई केली. पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे यांनी प्रसाद कॉलनीतील पवन प्रसाद अपार्टमेंट, राऊतवाडीतील पवन व्हिला अपार्टमेंट वरील दोन मोबाइल टॉवरवर सीलची कारवाई केली. या कारवाईत संजय खोशे, शैलेश पवार, नितीन नागलकर, राजेश अग्रवाल आदी सहभागी हाेते.